जर तुम्हालाही आधार कार्डमधील फोटो बदलायचाय, तर अशी पद्धत वापरा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 8:14 AM

जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ला आधार क्रमांक जारी करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

जर तुम्हालाही आधार कार्डमधील फोटो बदलायचाय, तर अशी पद्धत वापरा
जर तुमच्या माहितीशिवाय कोणताही मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडला गेला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा जुना आणि न वापरलेला नंबरही सहजपणे तुमच्या आधारवरून वेगळा करू शकता.
Follow us

नवी दिल्ली : भारतातील कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांक हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय. 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांना जारी केला जातो. ज्यात त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटो सोबत त्याची बायोमेट्रिक माहितीसुद्धा आहे.

छायाचित्र बदलण्यासाठी फक्त ऑफलाईन सुविधा

जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ला आधार क्रमांक जारी करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय. UIDAI नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल पत्ता आणि छायाचित्र बदलण्यासाठी फक्त ऑफलाईन सुविधा पुरवते. हे ऑनलाईन आणि पोस्टाद्वारे करता येत नाही.

नावनोंदणी केंद्रावर जात असेल तेव्हाच फोटो अपडेट करता येणार

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखादी व्यक्ती नावनोंदणी केंद्रावर जात असेल तेव्हाच फोटो अपडेट करता येईल. फोटोमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नावनोंदणी केंद्रात जावे लागेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काम देखील करू शकता.

आधार कार्डमधील फोटो बदलण्याची प्रक्रिया

>> प्रथम तुम्हाला UIDAI वेबसाईट uidai.gov.in वर लॉगिन करा आणि आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा. >> हा आधार नावनोंदणी फॉर्म भरा आणि जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जमा करा. >> आता कर्मचारी तुमचा बायोमेट्रिक तपशील आधार नोंदणी केंद्रात घेईल. >> आता आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल. >> आता आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमच्या आधार कार्डमध्ये 25 रुपये+जीएसटी फी घेऊन फोटो अपडेट करेल. >> आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुम्हाला यूआरएनसोबत एक स्लिपदेखील देईल. >> तुमचा आधार कार्ड फोटो बदलला गेला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही हे यूआरएन वापरू शकता. >> आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर नवीन फोटोसह अद्ययावत आधार कार्ड यूआयडीएआयच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

संबंधित बातम्या

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी 11 हजार कोटींच्या नव्या घोषणेच्या तयारीत, मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

आतापर्यंत 30 लाख खासगी नोकरदारांकडून ‘या’ सरकारी पेन्शन योजनेचा लाभ, 500 रुपयांपासून करा सुरुवात

If you also want to change the photo in Aadhar card, use this method

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI