AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रेडिट कार्ड वापरताय, मग या 7 चुका कधीच करु नका!

मुंबई : भारतात 2016 नंतर क्रेडिट कार्डच्या वापरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये देशात 2.7 कोटी क्रेडिट कार्ड वापरकर्ते होते, तर ती संख्या ऑगस्ट 2018 मध्ये 4.1 पर्यंत वाढलेली होती. यामुळे 2016-18 या दोन वर्षात क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे आता त्यांच्या चुकांमध्येही वाढ झाली […]

क्रेडिट कार्ड वापरताय, मग या 7 चुका कधीच करु नका!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM
Share

मुंबई : भारतात 2016 नंतर क्रेडिट कार्डच्या वापरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये देशात 2.7 कोटी क्रेडिट कार्ड वापरकर्ते होते, तर ती संख्या ऑगस्ट 2018 मध्ये 4.1 पर्यंत वाढलेली होती. यामुळे 2016-18 या दोन वर्षात क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे आता त्यांच्या चुकांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे काही फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत, तर क्रेडिट कार्ड बिल न भरल्यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागले जाते. यासाठी आम्ही तुम्हाला आज क्रेडिट कार्डबद्दलच्या अशा 7 चुकांबद्दल सांगणार आहोत, त्या तुम्ही कधीच करु नका.

कार्डची माहिती उघड करणे

बँक आणि क्रेडिट कार्ड कंपनी कधी तुम्हाला क्रेडिट कार्डची माहिती विचारत नाही. जर तुम्हाला कुणी कार्डची माहिती विचारल्यास समजा, तो व्यक्ती तुमची फसवणूक करत आहे. तुम्ही पेट्रोल पंप किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कार्ड देताना सावध राहणे गरजेचे आहे. कधीही तुमच्या कार्डचा पिन आणि माहिती इतर कुणाला सांगू नये. तुमचे कार्ड कुणाला देऊ नये.

 वेळेवर बिल भरणे

क्रेडिट कार्ड कंपनींना नेहमी असे ग्राहक आवडतात, जे वेळेवर बिल भरत नाहीत. बऱ्याचदा कंपनी आपल्या ग्राहकांना ई मेल आणि एसएमएसने बिल भरण्याचे रिमाइंडर मेसेज पाठवते. अशा रिमाइंडरला दुर्लक्ष करु नका, ठरलेल्या वेळेत नेहमी बिल भरत जा. बिल भरले नाही, तर त्यावर वाढीव शुल्क आकारले जाते. वेळेवर पैसे भरले नाही, तर तुमचा क्रेडिट कार्ड स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री बिघडते. यामुळे भविष्यात इतर लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळणे कठीण होते.

 कमीत कमी पैसे भरणे

एखाद्या क्रेडिट कार्डचे पैसे तुम्ही कमीत कमी भरले, तर उरलेल्या रकमेवर 2 ते 4 टक्क्यांचे व्याज लावले जाते. हा व्याज दर 24 ते 48 टक्क्यांपर्यंत जातो. क्रेडिट कार्डशिवाय इतर कोणत्याही कर्जाला इतका व्याजदर नसतो. अशावेळी ईएमआय सुविधा सुरु करावी. ईएमआयवर वर्षाला 15 ते 18 टक्के व्याज द्यावे लागते.

क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नका

क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे खूप महागात पडू शकते. क्रेडिट कार्डमधून काढलेल्या पैशांवर 2.5 टक्के चार्ज लागू शकतो. याशिवाय 2 ते 4 टक्के प्रत्येक महिन्याला व्याजही द्यावे लागते. आपत्कालीन परिस्थितीमध्येच तुम्ही पैसे काढा.

क्रेडिट कार्ड मर्यादा संपवू नये

क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्णपणे वापरु नये, ती राखून ठेवावी. कारण, यामुळे क्रेडिट कार्डच्या स्कोअरवर नकारात्मक फरक पडतो. एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करणाऱ्या ग्राहकांना भविष्यात इतर लोन मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्याकडे नेहमी एक कार्ड ऐवजी दोन ते तीन कार्ड ठेवा. यामुळे मोठा खर्च व्यवस्थित वाटून घेता येतो.

रिवॉर्ड पॉइंट्ससाठी खर्च करणे

क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्याकडून कार्डचा वापर करुन घेण्यासाठी अनेकदा ऑफर देत असते. बऱ्याचदा कंपनी रिवॉर्ड पॉइंट्सचे लालच ग्राहकांना देते. पण, हे पॉइंट्स कमवण्यासाठी अधिक खर्च करु नये. गरजेप्रमाणे क्रेडिट कार्डचा वापर करावा. प्रत्येक वर्षात किंवा दोन वर्षामध्ये रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करावा.

अचानक कार्ड बंद करणे

बऱ्याचदा दोन कार्ड असताना आपण एक कार्ड बंद करतो. असे बिलकूल करु नये. यामुळे क्रेडिट कार्डच्या वापराचे प्रमाण (यूटिलायझेशन रेशिओ) बिघडते. एक कार्ड बंद केल्यामुळे तुमच्या वापरण्याच्या प्रमाणात वाढ होते. कारण एक कार्ड बंद केल्याने दोन्ही कार्डवरील वापर हा एकाच कार्डवर येतो आणि कार्डच्या वापरण्याचे प्रमाण जास्त असल्याने स्कोअर बिघडतो. कार्डचा वापर करु नका, पण ते नेहमी अॅक्टिव्ह ठेवा.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.