Budget 2025 : 12 लाखापेक्षा तुमचं पॅकेज कमी असेल तर ही बातमी वाचा, टॅक्स तुम्हालाही भरावा लागेल, पण…
Budget 2025 : यंदाच्या बजेटमध्ये मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या टॅक्स सिस्टिममध्ये 12 लाखापर्यंतच्या सॅलरीवर कुठलाही टॅक्स न लावण्याची घोषणा केली आहे. जर, तुमची सॅलरी 12 लाखापेक्षा कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 12 लाखापेक्षा कमी पॅकेज असताना कुठल्या स्लॅबवर किती टॅक्स लागणार? ते पैसे परत कसे मिळणार? यासाठी एकदा हे वाचा.

केंद्र सरकारने मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. नव्या टॅक्स सिस्टिममध्ये 12 लाखापर्यंतच्या सॅलरीवर कुठलाही टॅक्स न लावण्याची घोषणा केली आहे. 12 लाखाच्या इनकमवर जो टॅक्स बसतो, त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला टॅक्स रिबेट मिळणार. जर, तुमची सॅलरी 12 लाखापेक्षा कमी आहे, तर कुठल्या स्लॅबवर किती टॅक्स लागणार हे जाणून घ्या. 12 लाखापेक्षा कमी सॅलरीचे किती स्लॅब आहेत ते जाणून घ्या. 12 लाखापेक्षा कमी इनकमचे तीन स्लॅब आहेत. यात पहिला शून्य ते चार लाख, दुसरा स्लॅब 4 लाख ते 8 लाख आणि तिसरा स्लॅब 8 लाख ते 12 लाखाचा आहे. आता समजून घेऊया कुठल्या स्लॅबवर किती टॅक्स बसणार.
तुमचा वर्षाचा पगार 4 लाख रुपये असेल, तर तुम्हाला एक पैशाचाही टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. तुमच इनकम 4 ते 8 लाखा दरम्यान आहे, तर 5 टक्के टॅक्स कापला जाणार. तिसरा स्लॅब तुमच उत्पन्न 8 ते 12 लाखा दरम्यान आहे, तर 10 टक्के टॅक्स कट होणार. तुम्ही विचार करत असाल, 12 लाखापेक्षा कमी उत्पन्नावर टॅक्स शून्य आहे. मग टॅक्स का कापला जाणार?.
टॅक्स म्हणून कापले गेलेले पैसे परत कसे मिळणार?
चार लाखाच्या पुढच्या दोन स्लॅबमध्ये जो टॅक्स लागणार, त्यात तुम्हाला रिबेट मिळणार आहे. म्हणजे, ज्यावेळी तुम्ही रिटर्न फाइल कराल, तेव्हा हे पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतील. सोप्या शब्दात पैसा टॅक्सच्या रुपात कापला जाणार. पण रिटर्न फाइल करताच ते पैसे तुमच्या बँक खात्यात पुन्हा जमा होतील.
📢 Zero Income Tax till ₹12 Lakh Income under New Tax Regime
▶️ Slabs and rates being changed across the board to benefit all tax-payers
▶️ New structure to substantially reduce taxes of middle class and leave more money in their hands, boosting household consumption, savings… pic.twitter.com/k2iDgegHFk
— PIB India (@PIB_India) February 1, 2025
…तर दंड द्यावा लागेल तो वेगळा
जर, तुम्हाला टॅक्समध्ये कापले गेलेले पैसे पुन्हा वेळेवर हवे असतील, तर त्यासाठी तुम्हाला वेळेवर रिर्टन फाइल करावा लागेल. कारण तुम्ही रिर्टन फाइल करायला विसरलात, तर टॅक्स म्हणून कापले गेलेले पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. इतकच नाही, रिटर्न फाइल न करण्यासाठी तुम्हाला दंड द्यावा लागणार तो वेगळा.
