AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Inflation | महागाईने तोडला रेकॉर्ड, एका वर्षात शाकाहारी-मांसाहारी थाळी किती झाली महाग?

Inflation | क्रिसिलचा एक अहवाल समोर आला आहे. त्यात एका वर्षात देशातील लोकांच्या जेवणाच्या थाळीवर महागाईचा काय परिणाम झाला याची माहिती देण्यात आली आहे. शाकाहारी आणि मांसाहारी लोकांची थाळी किती महाग झाली, किती स्वस्त झाली याची माहिती या संस्थेने दिला आहे.

Inflation | महागाईने तोडला रेकॉर्ड, एका वर्षात शाकाहारी-मांसाहारी थाळी किती झाली महाग?
| Updated on: Feb 07, 2024 | 4:14 PM
Share

नवी दिल्ली | 7 February 2024 : गेल्या एका वर्षात शाकाहारी जेवणाची थाळी महागली आहे. शाकाहारी जेवणासाठी खिशावर ताण आला आहे. तर दुसरीकडे मांसाहारी जेवणाऱ्यांची मात्र चंगळ झाली आहे, हा धक्कादायक खुलासा क्रिसिल या संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या महिन्याशी तुलना करता शाकाहारी भोजन करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटो आणि कांद्याच्या किंमती घसरल्याने हा बदल झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, हे आकडे महागाई कमी होण्याचे संकेत देत आहेत. क्रिसिल रिपोर्टमध्ये अजून काय म्हटले आहे, ते जाणून घेऊयात..

एका वर्षात व्हेज थाली किती महागली?

टोमॅटो आणि कांद्याची आवक वाढल्याने किंमती नियंत्रणात आल्या. त्यामुळे कांद्याच्या किंमतीत 26 टक्के तर टोमॅटोच्या किंमतीत 16 टक्के कपात झाली. या अहवालात शाकाहारी थाळीचा जो भाव देण्यात आला आहे, प्रत्यक्षातील किंमती त्याहून अधिक असल्याचे समोर येते. पण या अहवालानुसार, जानेवारीत व्हेज थालीची किंमत 28 रुपये होती. तर त्यापूर्वी एक महिन्याअगोदर डिसेंबर महिन्यात ही किंमत 29.7 रुपये होती. तर एक वर्षापूर्वी जानेवारी 2023 मध्ये थाळीचा भाव 26.6 रुपये होता.

एका वर्षात शाकाहारी थाळी महागली

  • रेटिंग एजन्सीने कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत वार्षिक आधारावर क्रमश: 35 टक्के आणि 20 टक्के वाढ झाल्याने शाकाहारी थाळी महागली आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी तांदळासह डाळीच्या किंमती भडकल्या. त्यामुळे किचन बजेट कोलमडले. शाकाहारी थाळीत तांदळाचा वाटा 12 टक्के आहे. तर डाळींचा वाटा 14 टक्के आहे.
  • घरी तयार होणाऱ्या मांसाहारी थाळी मात्र त्या तुलनेत स्वस्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये एका वर्षात मोठी घसरण आली आहे. ब्रॉयलरच्या किंमतीत एका वर्षात 50 टक्क्यांची घसरण आली आहे. ब्रॉयलरच्या किंमतीत एका वर्षाच्या आधारावर 26 टक्क्यांची घसरण होईल. जानेवारी महिन्यात नॉन व्हेज थाळीची किंमत 52 रुपये होती. तर गेल्या महिन्यात हा भाव 56.4 रुपये आणि गेल्या वर्षी या थाळीसाठी 59.9 रुपये मोजावे लागत होते.

जानेवारीत महागाईचा आकडा कमी

थाळीच्या किंमतींनी संकेत दिल्यानुसार, डिसेंबर महिन्यात महागाई गेल्या चार महिन्याच्या उच्चांकावर 5.7 टक्क्यांवर होती. गेल्या जानेवारी महिन्यात हा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. बार्कलेजच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात महागाई कमी होऊन 5.4 टक्क्यांवर येईल. त्यामुळे आरबीआय येत्या काळात, जून वा ऑगस्ट 2024 मध्ये रेपो दरात 25 बीपीएस कपातीचा सूखद धक्का देऊ शकते.

देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...