टेक्सटाईल कंपनीवर आयकराचे छापे, 350 कोटींचा काळा पैसा उघड

या गटाने आपल्या विदेशी खात्यांमध्ये सुमारे 350 कोटी रुपयांचा बेनामी निधी जमा केला आणि नंतर टॅक्स हेवन देशांतील शेल कंपन्यांच्या माध्यमातून भारतातील आपल्या व्यवसायात त्याचा समावेश केला.

टेक्सटाईल कंपनीवर आयकराचे छापे, 350 कोटींचा काळा पैसा उघड
फिक्स्ड डिपॉझिट

नवी दिल्लीः आयकर विभागाने कापड आणि फिलामेंट यार्नच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या एका मोठ्या व्यावसायिक गटावर छापा टाकून परदेशात कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा जप्त केलाय, अशी माहिती सीबीडीटीने मंगळवारी दिली. 18 सप्टेंबर रोजी कंपनीच्या दिल्ली, पंजाब आणि कोलकाता येथील कॉर्पोरेट कार्यालयात आणि समूहाच्या इतर ठिकाणी शोध सुरू होते. 350 कोटी रुपयांचा बेनामी निधी जमा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका निवेदनात दावा केला आहे. या गटाने आपल्या विदेशी खात्यांमध्ये सुमारे 350 कोटी रुपयांचा बेनामी निधी जमा केला आणि नंतर टॅक्स हेवन देशांतील शेल कंपन्यांच्या माध्यमातून भारतातील आपल्या व्यवसायात त्याचा समावेश केला.

बेनामी फंड विदेशी बँक खात्यात जमा

आयकर विभागाने सांगितले की, छाप्यादरम्यान अनेक संशयास्पद कागदपत्रे, डायरी, डिजिटल पुरावे सापडलेत. तसेच समूहाची परदेशात खाती आहेत आणि त्यात जमा केलेला बेनामी निधी भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवला गेलाय. परदेशी बँक खात्यांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली नाही.

बँक खात्यांच्या स्वरूपात व्यवस्थापित परदेशी मालमत्ता उघड करणे आवश्यक

कर विभागाने दावा केला आहे की, कंपनीने आपल्या खात्याच्या पुस्तकांबाहेर व्यवहार केलेत, जमिनीच्या व्यवहारांमध्ये रोख व्यवहार केलेत, खाते पुस्तकांमध्ये फसवणुकीचा खर्च दाखविलाय आणि बेहिशेबी रोख खर्च लपवलाय. सीबीडीटीने म्हटले आहे की, विभागाला आढळले आहे की, बेहिशेबी पैसे हाताळण्यासाठी परदेशी कंपन्या आणि ट्रस्टला व्यवस्थापन शुल्क दिले जात आहे. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये शेड्युल एफएसाठी कंपन्या आणि बँक खात्यांच्या स्वरूपात मालकीची/व्यवस्थापित परदेशी मालमत्ता उघड करणे आवश्यक आहे, असा आरोप करण्यात आलाय.

वैयक्तिक खर्चाशी संबंधित खात्यांचा तपशील कंपनीच्या एका मुख्य कार्यालयात काळजीपूर्वक ठेवण्यात आला होता, असे विभागाने म्हटले आहे. विभागाने पुरावे गोळा केले आहेत की कंपनीच्या खात्यांमध्ये आणि जमिनीच्या व्यवहारात 100 कोटी रुपयांचा फसवा खर्च दाखवण्यात आलाय, असे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

फक्त धान्यच नव्हे, तर पॅन कार्ड, मतदार कार्ड रेशनिंगच्या दुकानांवर वापरता येणार

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI