Income Tax: गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी पाळा आणि 40 हजारापर्यंत टॅक्स वाचवा

तुमच्या पगारात असणाऱ्या अलाऊन्समध्येही बदल झाल्यास तुमचा कर कमी किंवा जास्त होऊ शकतो. | Income Tax allowance

Income Tax: गुंतवणूक करताना 'या' गोष्टी पाळा आणि 40 हजारापर्यंत टॅक्स वाचवा
कर सल्लागार आणि आर्थिक तज्ज्ञ मुकेश कुमार झा म्हणतात की, प्रत्येकाने एक ते दोन बँक खाती ठेवावीत. एक आपले पगार खाते असेल तर दुसरे आपले वैयक्तिक बचत खाते असले पाहिजे. पगाराच्या खात्यात सर्व सेवा विनामूल्य आहेत आणि बचत खात्याच्या मदतीने आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकता. हे आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवणे सुलभ करेल, कमीत कमी शिल्लकतेचा भार, कर परतावा भरण्यात व्याज मोजावे लागेल.
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 1:14 PM

नवी दिल्ली: सध्याच्या महागाईच्या आणि अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक पैसा जपून वापरणे गरजेचे झाले आहे. एरवी तुम्ही गुंतवणूक करताना फारसे खोलात शिरत नाही. मात्र, यामुळे तुम्हाला जास्त कर (Tax) भरावा लागू शकतो. मात्र, नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास तुम्ही मोठ्याप्रमाणावर करबचत करु शकता. अगदी तुमच्या पगारात असणाऱ्या अलाऊन्समध्येही बदल झाल्यास तुमचा कर कमी किंवा जास्त होऊ शकतो. अशाप्रकारची आर्थिक पथ्यं पाळल्यास वर्षाला तुम्ही जवळपास 40 हजार रुपयांची करबचत करु शकता. (How to save income tax by investing smartly)

समजा तुमचे वार्षिक उत्पन्न 14 लाख इतके असेल. अशावेळी तुम्ही करबचतीसाठी आयुर्विमा (लाइफ इन्शुरन्स) काढला असेल आणि पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाला 26 हजार रुपये गुंतवत असाल.

बहुतांश कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना leave travel allowance (LTA) देतात. मात्र, त्याजागी तुम्ही कर वाचवणारा एखाद्या पर्यायाची मागणी करु शकता. सध्या लॉकडाऊनमुळे तुम्हाला बाहेरगावी फिरण्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे तुम्ही LTAच्या माध्यमातून मिळणारी कर सवलत मिळवू शकत नाही. त्याऐवजी तुम्ही कंपनीला कॉम्प्युटर किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅझेटससाठी अलाऊन्स देण्याची मागणी करु शकता.

करबचत कशी होणार?

LTA ऐवजी तुम्ही फ्री पर्क्सच्या माध्यमातून 60 हजार रुपये खर्च केले तर जवळपास 12500 रुपयांचा कर वाचू शकतो. तसेच प्रत्येक महिन्याला वर्तमानपत्र आणि मॅगझिनसाठी अलाऊन्स मिळाला तर तिथे तुमची 1250 रुपयांची करबचत होऊ शकते. मात्र, त्यासाठी तुम्हाला कंपनीला बिलं द्यावी लागतील.

NPS चा फायदा मिळवा

तुम्ही कंपनीकडे NPS बेनिफिट देण्याची मागणी करु शकता. आयकर कायद्यातील सेक्शन 80CCD(2) नुसार तुम्हाला बेसिक वेतनाच्या 10 टक्के रक्कम पेन्शन स्कीममध्ये गुंतवता येऊ शकते. या हिशेबाने तुमच्या कंपनीने प्रत्येक महिन्याला 5,967 रुपये पेन्शन स्कीममध्ये जमा केले तर तुम्ही जवळपास 15 हजार रुपयांची करबचत करु शकता.

वैयक्तिक गुंतवणूक कशी कराल?

तुम्ही सेक्शन 80CCD(2) अंतर्गत येणाऱ्या योजनांमध्ये 50 हजाराची गुंतवणूक केल्यास करबचत होऊ शकते. याशिवाय, तुम्हाला इक्विटी फंड आणि बाँड फंडमध्येही गुंतवणूक करुन करबचता करता येऊ शकते.

कर वाचवण्यासाठी काय कराल?

1. पगारात स्पेशल अलाउन्स म्हणून मिळणारी रक्कम कमी करण्यासाठी कंपनीला विनंती करा. त्याऐवजी पगाराचा हा भाग कर नसलेल्या पर्यायांकडे वळवा. 2. LTA चा काही भाग कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टींसाठी मिळणाऱ्या अलाऊन्सकडे वळवा. 3. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPA) गुंतवणूक करा.

(How to save income tax by investing smartly)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.