AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 15 August 2024 : स्वातंत्र्य दिनी सोने-चांदीचा भाव किती? गेल्या वर्षीच्या तुलनेत इतका वधारला भाव, किंमती जाणून घ्या

Gold Silver Rate Today 15 August 2024 : आज देशात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. काही जण या राष्ट्रीय सणाला मुद्दामहून खरेदी करतात. त्यांच्यासाठी सोने आणि चांदीने आनंदवार्ता आणली आहे. गेल्या स्वातंत्र्य दिनी या दोन्ही धातूंचा जो भाव होता, त्यापेक्षा किंमती इतक्या वधारल्या आहेत.

Gold Silver Rate Today 15 August 2024 : स्वातंत्र्य दिनी सोने-चांदीचा भाव किती? गेल्या वर्षीच्या तुलनेत इतका वधारला भाव, किंमती जाणून घ्या
सोने-चांदीची आनंदवार्ता
| Updated on: Aug 15, 2024 | 8:39 AM
Share

आज 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण. सकाळपासूनच रस्त्यांवर, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयासमोर देशभक्तीचा महापूर पाहायला मिळत आहे. या राष्ट्रीय सणाला सोने-चांदीची खरेदी करणे हे पण शुभ मानल्या जाते. अशा ग्राहकांना या मौल्यवान धातूंनी मोठा दिलासा दिला. या मंगल दिनाच्या पूर्वसंध्येला दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली. पण गेल्या स्वातंत्र्य दिनी या दोन्ही धातूंचा जो भाव होता, त्यापेक्षा किंमती इतक्या वधारल्या आहेत.आता काय आहेत बेशकिंमती धातूचा दर? (Gold Silver Price Today 15 August 2024 )

किंमतीत इतका पडला फरक

गेल्या स्वातंत्र्य दिनी, 15 ऑगस्ट 2023 रोजी गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,760 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. तर यावेळी ता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. म्हणजे 22 कॅरेट सोने 10,900 रुपयांनी वाढले आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 11,900 रुपयांनी वधारला आहे. गेल्या स्वातंत्र्य दिनी, गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये होता. तर या स्वातंत्र्य दिनी हा भाव एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे. म्हणजे किलोमागे चांदी 10,200 रुपयांनी महागली आहे.

सोने झाले स्वस्त

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. पहिल्या दिवशी सोमवारी सोने 270 रुपयांनी तर 13 ऑगस्ट रोजी 104 रुपयांनी सोने महागले. 14 ऑगस्ट रोजी त्यात 110 रुपयांची घसरण झाली. सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूत घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत चढउताराचे सत्र

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 4200 रुपयांनी स्वस्त झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत चढउताराचे सत्र आहे. 12 ऑगस्ट रोजी चांदी किलोमागे 600 रुपयांनी स्वस्त झाली. 13 ऑगस्टला 1 हजार रुपयांनी चांदी महागली. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70793, 23 कॅरेट 70,510, 22 कॅरेट सोने 64,846 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,095 रुपये, 14 कॅरेट सोने 41,414 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 80,921 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य