चंद्रावर न्यूक्लीयर पॉवर प्लांट उभारण्यासाठी तीन महाकाय देश एकत्र येणार ? भारताची काय भूमिका?

आता चंद्रावर मानवी तळ निर्माण करण्यासाठी आता जगातील तीन महाकाय देश एकत्र येणार आहेत. ही महत्वाकांक्षी योजना तडीस नेण्यासाठी चंद्रावर अणू भट्टी उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.

चंद्रावर न्यूक्लीयर पॉवर प्लांट उभारण्यासाठी तीन महाकाय देश एकत्र येणार ? भारताची काय भूमिका?
putin, Xi Jinping and modi
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 9:25 PM

चंद्रावर मानवी जीवन वसविण्यापेक्षा तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क गाजविण्यासाठी सारे जगातील महाशक्ती मागे लागल्या आहेत. शीत युद्धकाळात रशिया आणि अमेरिकेची चंद्रावर अंतराळ मोहीमा राबविण्याची स्पर्धा लागली होती. रशिया  चंद्रावर मानवी बेस तयार करणार आहे. आणि  त्या मानवी तळाला वीज पुरविण्यासाठी चंद्रावर अणू भट्टी उभारण्याची तयारी रशिया करीत आहे.

युरेशियन टाईम्सच्या वृत्तानूसार रशियाच्या सरकारी न्युक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन निर्मिती Rosatom चे प्रमुख एलेक्सी लिखाचेव यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पात आमच्या मदतीला भारत आणि चीन दोन्ही देशांनी उत्सुकता दाखविली आहे.भारतासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. कारण साल 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठविण्याची भारताची योजना आहे. तसेच तेथे एक मानवी तळ बनविण्याची देखील योजना आहे. या योजनेत चीनचाही सहभाग असला तरी रशिया या आपल्या जुन्या मित्राला मदत करण्यासाठी भारत नकार देऊ शकत नाही असे म्हटले जात आहे. यालाच स्पेस डिप्लोमसी म्हटले जात आहे.

पृथ्वीवर तयार होणार, चंद्रावर लावण्यात येणार

इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना लिखाचेव यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहभागासह आमचे चीन आणि भारतीय सहभागदार या योजनेत खूपच रस दाखवित आहेत. रशियाची अंतराळ संशोधन संस्था Roscosmos ने लूनार न्युक्लिअर पॉवर प्लांटवर काम देखील सुरु झाले असल्याचे मे महिन्यातच जाहीर केले होते. न्युक्लीयर रिएक्टरला पृथ्वीवरच तयार करुन चंद्रावर लावण्यात येणार आहेत. हा न्युक्लीअर रिएक्टर या मानवी तळाला वीज पुरविणार आहे. यावर रशिया आणि चीन काम करीत आहे. रशियाच्या या प्रकल्पाद्वारे मानवी तळासाठी अर्धा मेगावॅट वीज तयार करण्याची योजना आहे.

डिप्लोमसीनंतर मिळणार फायदा?

अमेरिका आणि रशिया दरम्यान आतापर्यंत बॅलन्स ठेवण्यात यशस्वी असलेला भारत पुढेही असेच वागणार आहे. एका बाजूला मिशन गगनयान मध्ये सामील अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ( ISS ) पाठविले जाणार आहे. दुसरीकडे भारत, रशियाच्या या प्रोजेक्टमध्ये चीन सोबत काम करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे.

कसा तयार होणार रशियाचा हा न्युक्लीअर रिएक्टर

या न्युक्लीअर रिएक्टर निर्मितीत संशोधक थेट सामील होणार नाहीत. सर्व काम ऑटोनॉमसली होणार असल्याचे रशियन अंतराळ संशोधन Roscosmos ने म्हटले आहे. चीन आणि रशियाने 2021 मध्ये संयुक्त रुपाने चंद्रावर बेसवर तयार करण्याची घोषणा केली होती. यास इंटरनॅशनल लूनर रिसर्च स्टेशन (ILRS) म्हटले जाते. या मानवी तळाची निर्मिती साल 2035 ते 2045 दरम्यान होणार आहे.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.