AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2021: करदात्यांना झटका बसण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कररचनेत बदल होणार?

यंदाच्या 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार मध्‍यमवर्गीयांना झटका देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Budget 2021: करदात्यांना झटका बसण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कररचनेत बदल होणार?
Updated on: Jan 22, 2021 | 1:00 AM
Share

नवी दिल्‍ली : केंद्रीय अर्थसंकल्पावर (Union Budget 2021) सर्वांच्याच नजरा असतात. करदात्यांना (Taxpayers) दरवर्षी भराव्या लागणाऱ्या कराच्या दरांमधून (Income Tax Rates) काही सुटका होईल का याची आशा असते. दुसरीकडे देशातील गरीब आणि वंचित समाज सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करतं याकडे लक्ष ठेऊन असतो. यंदाच्या 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार मध्‍यमवर्गीयांना झटका देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यावेळी कररचनेत (Tax Slabs) कोणताही बदल न करण्याच्या विचारात आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये व्यक्तिगत करासाठी कोणतीही सूट मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत (Indian Budget 2021 may shock taxpayers what are possibilities).

अर्थ मंत्रालय (Ministry of Finance) करदात्यांना खूश करण्यासाठी इतर काही उपाययोजनांचा विचार करत आहे. त्याचाच भाग म्हणून अर्थ मंत्रालय आयकर कायद्याच्या (Income Tax Act) कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीच्या मर्यादेत वाढ करण्यावर मंथन करत आहे. सध्या कलम 80C नुसार (Section 80C) 1.5 लाखांपर्यंतची कर सवलत मिळते. केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर करणाऱ्या अर्थसंकल्पात सेक्शन-80C अंतर्गत मिळणाऱ्या सुटीची मर्यादा 1.5 लाख रुपयांवरुन 2 लाख रुपये करु शकते.

2021 च्या अर्थ संकल्पात गृह कर्जाचं (Home Loan) व्याज आणि मूश रकमेवर आकारण्यात येणाऱ्या दरात कपात होऊ शकते. सध्याच्या कर रचनेनुसार, 2.5 ते 5 लाख रुपयांचं उत्पादन असणाऱ्यांवर 5 टक्के, 5 ते 10 लाख रुपयांसाठी 20 टक्के आणि 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर 30 टक्के कर लावला जातो. नवी कर रचना निवडणाऱ्यांसाठी हे कराचे दर वेगळे आहेत. अर्थ मंत्री सीतारमण 1 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत आपला अर्थसंकल्प ठेवतील.

हेही वाचा :

केंद्र सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त आहे देशाच्या ‘या’ तीन कंपन्यांची संपत्ती!

सरकारकडे आलेला एक रुपया किती जागी खर्च होतो? सविस्तर जाणून घ्या

व्हिडीओ पाहा :

Indian Budget 2021 may shock taxpayers what are possibilities

शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!
शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!.
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी.
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत.
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत.
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक.
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर.
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले.
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान.
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...