Stock Market : शेअर बाजारात मोठा बदल! आता हक्काच्या पैशांसाठी नाही पहावी लागणार वाट, काय आहे T+ 1

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 20, 2023 | 8:45 PM

Stock Market : भारतीय शेअर बाजारात आणखी एक मोठा बदल होत आहे, अर्थात त्याचा फायदाच होणार आहे.

Stock Market : शेअर बाजारात मोठा बदल! आता हक्काच्या पैशांसाठी नाही पहावी लागणार वाट, काय आहे T+ 1

नवी दिल्ली : भारतीय इक्विटी बाजारात (Equity Market) 27 जानेवारी 2023 रोजी गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट आहे. या दिवशी शेअर बाजारात (Share Market) मोठा बदल होत आहे. बाजारात आता ट्रेंड पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांना त्यांची सेटलमेंटची रक्कम खात्यात जमा (Bank Account) होण्यासाठी वाट पहावी लागणार नाही. त्यांची रक्कम अवघ्या 24 तासात खात्यात जमा होईल. यासंबंधीच्या नियमाची पुढील आठवड्यात अंमलबजावणी होत आहे. खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांना 24 तासात रक्कम मिळण्याची परवानगी मिळणार आहे. लार्ज कॅप आणि ब्लू-चिप कंपन्यांना पुढील आठवड्यात T+1 ही सुविधा देतील.

सध्या शेअर बाजारात T+2 पद्धत लागू आहे. यामुळे बँक खात्यात ट्रेड सेटलमेंटनंतरची रक्कम पोहचण्यास 48 तासांचा कालावधी लागतो. शेअर बाजारात T+2 नियम 2003 साली लागू करण्यात आला होता. 27 जानेवारी 2023 रोजी आता हा नियम बदलेल.

T+1 सुविधेमुळे गुंतवणूकदारांना निधी आणि शेअरमध्ये तेजीने ट्रेड सेटलमेंट करता येतील . त्यांच्या खात्यात आता पूर्वीपेक्षा एक दिवस आधी रक्कम जमा होईल. सेटलमेंटची सायकल आता लवकर पूर्ण होईल. त्यामुळे गुंतवणूकदाराची रक्कम अडकून राहणार नाही.

हे सुद्धा वाचा

शेअर बाजारात खरेदीदार आणि विक्री करणारे यांच्यात ट्रेड पूर्ण झाला की रक्कम ही लवकर मिळेल. जुन्या नियमामुळे सेटलमेंटसाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत होती. पण आता एका दिवसातच ट्रेड सेटलमेंट होतील.  त्यामुळे तुमच्या बँक खात्यात रक्कम लवकर जमा होईल.

अर्थात या नियमामुळे बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. एकाच दिवसात खात्यात रक्कम येत असल्याने व्यवहारांनाही गती मिळेल. तर परदेशातील गुंतवणूकदारही आता जादा रक्कम गुंतवू शकतील.

दुसरीकडे काही तज्ज्ञांना हा नियम रुचला नाही. या नियमामुळे बाजारात आता मोठे चढउतार पहायला मिळतील, अशी आशंका त्यांनी व्यक्त केली आहे. काही कॉर्पोरेट्स, परदेशी गुंतवणूकदार, मोठे शेअरधारक याचा फायदा उचलत धडाधडा ट्रेड पूर्ण करुन बाजाराला हलते ठेवतील असा त्यांचा अंदाज आहे.

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI