AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गूगलकडून 1.6 कोटी पॅकेज, त्यानंतरही अमेरिकेत पगार ठरतो कमी, भारतीय मुलीने दाखवले गणित

Expenses in New York : गूगलमध्ये तिचे पॅकेज १.६ कोटी म्हणजे महिन्याला जवळपास १३ लाख रुपये आहे. मोठ्या शहरात सात आकडी पगारही कमी पडत असल्याचा दावा मैत्री मंगल हिने केला आहे.

गूगलकडून 1.6 कोटी पॅकेज, त्यानंतरही अमेरिकेत पगार ठरतो कमी, भारतीय मुलीने दाखवले गणित
मैत्री मंगल
| Updated on: Jul 10, 2025 | 12:02 PM
Share

Expenses in New York : टेक कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या मोठ मोठ्या पॅकेजची चर्चा नेहमीच होत असते. परंतु हे पॅकेज मोठ्या शहरांमध्ये मात्र कमीच ठरत असतात. या पॅकेजच्या माध्यमातून महिन्याचा खर्च चालवणे अवघड असते. गूगलमध्ये १.६ कोटी पॅकेज घेणारी भारतीय मुलगी मैत्री मंगल हिने यासंदर्भात गणित मांडले आहे. मैत्री मंगल हिची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे.

मैत्री मंगल गूगलमध्ये कार्यरत आहे. गूगलमध्ये तिचे पॅकेज १.६ कोटी म्हणजे महिन्याला जवळपास १३ लाख रुपये आहे. मोठ्या शहरात सात आकडी पगारही कमी पडत असल्याचा दावा मैत्री मंगल हिने केला आहे. न्यूयॉर्कमध्ये पॉडकॉस्ट करणाऱ्या कुशल लोढासोबत मैत्रीने आपले अनुभव शेअर केले. त्यात मिळणारा पगार आणि अमेरिकेतील खर्च तिने दाखवला आहे.

असा होतो खर्च

मैत्री म्हणते, तुम्हाला न्यूयॉर्कसारख्या शहरात राहायचे असल्यास जास्त खर्च करण्यास तयार असले पाहिजे. या ठिकाणी राहणे स्वस्त नाही. महिन्याला १३ लाख पगारातून अवघड परिस्थितीत महिन्याचा खर्च चालवला जातो. न्यूयॉर्क सर्वाधिक महागडे शहर आहे. मैत्रीने सोशल मीडियावर ती राहत असलेल्या अपार्टमेंटचा फोटो व्हायरल केला आहे. त्याचे महिन्याचे भाडे २.५ लाख रुपये आहे. महिन्याला ४.२ लाख रुपये (पाच हजार डॉलर) गरजेच्या वस्तूंवर खर्च होतात. दैनंदिन खर्च चालवण्यासाठी १ ते २ हजार डॉलर (८६ हजार ते १.७१ लाख रुपये) लागतात. तसेच कार्यालयात जाण्यासाठी वाहतूक खर्च २०० डॉलर (१७ हजार रुपये) होतो. हा व्हिडिओ पहिल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये राहणे सोपे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मैत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तिला काही यूजरने खर्च कमी करणे आणि न्यूयॉर्कमध्ये कमी पैशांमध्ये राहण्याचे उपाय सांगितले आहे. मैत्रीचे इंस्टाग्रामवर १७.३ लाख फॉलोअर्स आहे. कारण तंत्रज्ञानासंदर्भातील अनेक व्हिडिओ ती व्हायरल करत असते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.