CBDC | आता भारताची स्वतःची डिजिटल करन्सी, CBDC चं रुपडं लवकरच लाँच होणार

जगात अभासी पैशाने सध्या धुमाकूळ घातला आहे. क्रिप्टो करन्सी वा इतर करन्सीमध्ये गुंतवणूक करणा-यांमध्ये जागतिक उद्योजकापासून तर सर्वसामान्य लोकही आहेत. मात्र या करन्सीला अद्यापही अधिकृत दर्जा प्राप्त नाही. या करन्सीकडे संशयाने पाहिले जात असतानाच आता भारतीय रिझर्व्ह बँकेने या अभासी जगतात उडी घेतली आहे. आरबीआयने लवकरच भारतासाठी स्वतःची डिजिटल करन्सी आणण्याचा विडा उचलला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेउयात...

CBDC | आता भारताची स्वतःची डिजिटल करन्सी, CBDC चं रुपडं लवकरच लाँच होणार
rbi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 17, 2021 | 11:32 AM

कागदी नोटा आल्या तसा कथल्याच्या वाळाच्या गप्पा हद्दपार झाला. आता  डिजिटल युगात कागदी नोटांना हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. क्रेडीट, डेबीट क्रार्डनंतर डिजिटल पेमेंटमुळे नगद व्यवहार अवघ्या काही सेकंदावर आणि एक-दोन क्लिकवर आला आहे. चलनाचा इतिहास खूप जुना असला तरी त्यातील होत गेलेले बदल काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय रिझर्व्ह बँकेने देशाची स्वतःची डिजिटल करन्सी आणण्याचा मानस व्यक्त केला आहे.

क्रिप्टो करन्सीवरुन देशात अविश्वासाचे वातावरण आहे. सरकारने या चलनाच्या देवाण-घेवाणीला अद्यापही अधिकृत घोषीत केलेले नाही. त्यासाठी संसदेत बिल आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयने  काळाची पाऊले ओळखत डिजिटल करन्सी मार्केटमध्ये उपलब्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. या करन्सीचे नाव सेंट्रल बँक ऑफ  डिजिटल करन्सी (CBDC) असे आहे. दोन टप्प्यात ही करन्सी आणण्याचा प्रयत्न बँक करणार आहे. ईटी नाऊ स्वदेशच्या अहवालानुसार, (CBDC) बेस्ड होलसेल अकाऊंट साठी पायलट टेस्टिंग लवकरच सुरु होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक डिजिटल करेन्सीच्या लोकार्पणासाठी स्वतःला पुर्णपणे तयार ठेवले आहे.

इनोवेशन हब करत आहे काम

अहवालानुसार, बँकेचा नाविन्यपूर्ण विभाग (Reserve Bank Innovation Hub) डिजिटल करंन्सीवर काम करत आहे. दोन टप्प्यात ही करंन्सी आणण्यात येईल. सर्वात अगोदर, रिझर्व्ह बँक होलसेल बेस्ट सीबीडीसी लॉंच करेल. याचं विकसीत रुप तयार झाले आहे. याचीही प्रायोगिक चाचणी लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी द क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (CCIL)  या प्रकल्पासाठी मोठे सहकार्य लागणार आहे.

 

आता हवी सरकारची मंजुरी

या संपूर्ण प्रकल्पासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला अर्थातच केंद्र सरकारच्या हिरवा कंदिल हवा आहे. केंद्राची मंजुरी मिळताच, सेंट्रल बँक डिजिटल करंन्सी (CBDC) ला बँकिंग रेग्युलेशन एक्टद्वारे अधिकृत स्वीकृती मिळेल आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचा अधिकार प्राप्त होईल. आता केंद्र सरकार या योजनेला कसा प्रतिसाद देते, मंजुरीला किती दिवस लावते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यावरच सेंट्रल बँक डिजिटल करंन्सी (CBDC) च्या होलसेल बेस्ड प्रॉडक्ट येण्याला मुहूर्त लागणार आहे.

वित्त मंत्रालयाने, याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या निवदेनात, सेंट्रल बँक डिजिटल करंन्सीसाठी (CBDC) सरकारपुढे प्रस्ताव प्रलंबित आहे. सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. ही करंन्सी क्रिप्टो करंन्सी सारखी नसेल तर रुपयांसारखी ही नसेल.

HSC and SSC board exam date : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर

Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या जागेवरील एसआरए प्रकल्प बंद पाडला, भूखंड ताब्यात घेतल्यास राजीनामा देईन-सामंत

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें