AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Price Increase : महागाई थांबता थांबेना! साबणपासून चॉकलेटपर्यंत किंमती वाढणार! किंमती वाढण्यामागचं कारण काय? जाणून घ्या…

इंधनाची दरवाढ नेहमीची झालेली असताना रोज वापरातल्या गोष्टींच्या किमती वाढणार असल्याची बातमी आहे.

Price Increase : महागाई थांबता थांबेना! साबणपासून चॉकलेटपर्यंत किंमती वाढणार! किंमती वाढण्यामागचं कारण काय? जाणून घ्या...
खाद्यतेलImage Credit source: twitter
| Updated on: Apr 26, 2022 | 9:50 AM
Share

मुंंबई : महागाई थांबना थांबेना, असं म्हणायची वेळ आता सर्वसामन्यांवर आली आहे. रोज पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel price) किंमती (price) वाढून महागाईला फोडणी दिली जात आहे. तर दुसरीकडे आता रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती देखील वाढणार आहेत. त्यामुळे आधीच खिशाला कात्री लागलेली असताना पुन्हा महागाईचा फटका बसणार असल्याचं दिसतंय. अनेक तेलांमध्ये पाम तेल (oil) मिसळले जाते. कारण त्याला वास येत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एफएमसीजी आणि सौंदर्य प्रसाधने कंपन्याही पाम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. भारत सुमारे 9 दशलक्ष टन पामतेल खरेदी करतो. यातील 70 टक्के पामतेल इंडोनेशियामधून आयात केले जाते. मात्र, देशातील खाद्यतेलाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे इंडोनेशिया 28 एप्रिलपासून पाम तेलाची निर्यात थांबवत आहे. या निर्णयाचा भारतावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. कारण, आपन आपलं निम्म्याहून अधिक पामतेल इंडोनेशियाकडून खरेदी करतो. पामतेल महागल्याने खाद्यतेल तर महागणारच पण शाम्पू-साबणापासून ते केक, बिस्किटे, चॉकलेट्सच्या किमती वाढणार आहेत.

नेमकं कारण काय?

तज्ज्ञांनी सांगितलंय की, अनेक तेलांमध्ये पाम तेल मिसळले जाते कारण त्याला सुगंध नसतो. एफएमसीजी आणि सौंदर्य प्रसाधने कंपन्याही पाम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. भारत सुमारे 9 दशलक्ष टन पामतेल खरेदी करतो. यातील 70 टक्के पामतेल इंडोनेशियामधून आयात केले जाते. इंडोनेशियातून पामतेल निर्यात बंद झाल्यानंतर मलेशियावरील अवलंबित्व वाढेल आणि खाद्यतेलाच्या किमती वीस टक्क्यांनी वाढू शकतात. जगात सर्वात लोकप्रिय वनस्पती तेल आहे. जगभरातील सुमारे 50 टक्के घरगुती उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो. पाम तेलाचा सर्वाधिक वापर स्वयंपाकाचे तेल म्हणून केला जातो. हे शाम्पू, आंघोळीचे साबण, टूथपेस्ट, व्हिटॅमिन गोळ्या, कॉस्मेटिक उत्पादने, केक आणि चॉकलेट इत्यादींमध्ये देखील वापरले जाते.

सरकारने इंडोनेशियाशी चर्चा करावी

द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) ऑफ इंडिया ही खाद्यतेल उद्योगाची संघटनेनं इंडोनेशियाच्या प्रस्तावित पाम तेल निर्यातीवर बंदी घालण्याबाबत सरकारी पातळीवर त्वरित चर्चा करण्याची सूचना केली आहे. SEA चे महासंचालक बी व्ही मेहता म्हणाले की, ‘इंडोनेशियाच्या निर्णयाचा आपल्या देशांतर्गत बाजारपेठेवर गंभीर विपरीत परिणाम होईल. कारण, पामतेलाच्या एकूण आयातीपैकी निम्मी आयात तिथून केली जाते. ही पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. त्यामुळे याबाबत आम्ही केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या संपर्कात आहोत.’ दरम्यान, या रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना आणखी झळ बसेल.

इतर बातम्या

Raj Thackeray Aurangabad Sabha : आरपीआय गटाचा राज ठाकरेंच्या सभेला विरोध, औरंगाबादेत राजकारण तापलं !

Gunratna Sadavarta : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस सज्ज! आर्थर मधून आता कोणत्या जेलमध्ये?

Elon Musk Twitter Share Price : 3 अब्ज डॉलर कॅश शिल्लक! 44 अब्ज डॉलरची जमवाजमव करण्यासाठी काय रणनिती?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.