AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाही वाढणार कर्जाचा हप्ता, रेपो दर कायम, RBI चा फैसला

RBI Repo Rate | भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीने 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दरात 2.50 टक्क्यांची वाढ केली आहे. एप्रिल महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत 4 बैठकी झाल्या. त्यात रेपो दर वाढविण्यात आले नाहीत. ते जैसे थे ठेवण्यात आले. पण ते कमी न झाल्याने ग्राहक अजूनही नाराज आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नाही वाढणार कर्जाचा हप्ता, रेपो दर कायम, RBI चा फैसला
| Updated on: Dec 08, 2023 | 10:24 AM
Share

नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : अखेर अंदाजाप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील नागरिकांना दिलासा दिला. आरबीआयने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. एप्रिलपासून ते ऑक्टोबरपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली नव्हती. ही हॅटट्रिक साधल्यानंतर आता रेपो दरात कुठलीही वाढ न करण्याचा फैसला केंद्रीय बँकेने केला. या निर्णयाने आरबीआयने चमत्कार घडवला आहे. महागाईने गेल्या वर्षापासून नागरिकांचे पार कंबरडे मोडले आहे. कोणत्याच आघाडीवर जनतेला दिलासा मिळालेला नाही. सर्वच वस्तूचे भाव वाढलेले आहे. त्यात अन्नधान्य, डाळी, तेल, गॅस, पेट्रोल-डिझेल, सीएनजी यांचे भाव वाढलेले आहे. कर्जाचे वाढीव हप्ते भरता भरता कर्जदार मेटाकुटीला आले आहेत. या 6 डिसेंबरपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरु होती. आज या बैठकीतील निर्णय जाहीर करण्यात आला.  चालू आर्थिक वर्षातील 5 वी आणि या कॅलेंडरप्रमाणे 6 वी बैठक झाली. या बैठकीत ग्राहकांच्या खिशाची काळजी घेण्यात आली.

महागाईने वाढवली चिंता

नोव्हेंबर महिन्यात CPI महागाईच आकडे चिंता वाढवणारे असल्याचे संकेत मिळत आहे. हा आकडा अंदाजपेक्षा जास्त म्हणजे 6 टक्क्यांच्यावर पोहचण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या टॉलरेंस बँडपेक्षा हा आकडा अधिक आहे. त्यामुळे महागाई ही रेपो दर वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. जागतिक बाजारात इंधनाचे दर घटले आहे. नोव्हेंबर महिन्यात टोमॅटो आणि कांद्याने डोके वर काढले होते. डाळी आणि इतर अन्नधान्याच्या किंमती वाढल्याने महागाई वाढली आहे. येत्या काही महिन्यात या आघाडीवर दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. पण आरबीआयने ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला.

वर्षभरात इतकी वाढ

व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर रेपो दरात वाढ झालेली नाही.

व्याज दर वाढण्याची शक्यता कमी

अनेक तज्ज्ञ यावेळी पण आरबीआय रेपो दरात वाढ करणार नसल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता.  केंद्रीय बँक धोरणात बदल करु शकते. व्याज दर न वाढल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. केंद्रीय बँकेने यावर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात वाढ केली होती. पण चालू आर्थिक वर्षात, एप्रिल महिन्यापासून रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.