Gold Investment : किती ही नाराजी! 90 टक्के भारतीयांनी फिरवली या सोन्याकडे पाठ

Gold Investment : सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. पण सोन्याच्या या पर्यायाकडे भारतीयांनी एकदम पाठ वळवली आहे. 

Gold Investment : किती ही नाराजी! 90 टक्के भारतीयांनी फिरवली या सोन्याकडे पाठ
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 7:23 PM

नवी दिल्ली  : भारतीयांचे सुवर्ण वेड जगाला माहिती आहे. चीन पाठोपाठ भारतात सर्वाधिक सोने आयात (Gold Import) होते. सुवर्ण अलंकार, दाग-दागिने, आभुषण, ठोक सोने, गोल्ड बाँड यासारख्या अनेक पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. परंतु, सोन्यातील (Gold Investment) एका पर्यायात अचानक लोकांनी गुंतवणूक करणेच जणू बंद केले. 2022 मध्ये ग्राहकांनी ज्वेलरी तर मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पण गोल्ड ईटीएफकडे सपशेल पाठ वळवली. सोन्याच्या किंमती (Gold Price) गगनाला भिडल्याने तसेच महागाई प्रचंड वाढल्याने ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्सकडे (ETF) पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये ईटीएफमधील गुंतवणूक  90 टक्क्यांनी घटून 459 कोटी रुपये इतकीच आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया ( AMFI) यांनी याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, 2021 मध्ये  गोल्ड ईटीएफमध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर 2020 मध्ये  6,657 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

पण गेल्यावर्षी सोन्याने जशी उसळी मारली, तशी गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला. त्यांनी ठोक सोने, दागिने, आभुषण यांची खरेदी केली. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केली. पण ईटीएफकडे दुर्लक्ष केले. परंतु, गोल्ड ईटीएफच्या गुंतवणूकदार खातेदारांच्या पोर्टफोलिओंची संख्या वाढली आहे. 2021 पेक्षा 2022 मध्ये ही संख्या वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

मॉर्निंगस्टार इंडियाचे वरिष्ठ विश्लेषक कविता कृष्णन यांच्या मते, सोन्याचे वाढते दर गुंतवणूकदारांना हैराण करत आहे. या वाढत्या किंमतींचा त्यांच्यावर दबाव आहे. अनेक लोक गुंतवणूक करण्यासाठी धजावत नाहीत. महागाईमुळे बचत करण्यावर बंधने येतात. सोने सुरक्षित साधन असले तरी वाढत्या किंमती चितेंचा विषय ठरल्या आहेत.

गुंतवणूकदारांनी इतर पर्यायांपेक्षा शेअर बाजारात गेल्या वर्षी 2022 मध्ये अधिक गुंतवणूक केली आहे. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी इन्स्टंट मनी कमाविण्यासाठी अनेक जण शेअर बाजाराकडे वळले आहेत.

2022 मध्ये गुंतवणूकदारांनी शेअरमध्ये 1.6 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक वर्ष 2021 पेक्षा अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी 96,700 कोटी रुपये शेअर बाजारात आले होते. शेअर बाजारातून झटपट कमाई करता येईल, या आशेवर त्यांनी कमाई केली होती.

त्यानंतर गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर भर दिला. पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे  (SIP) त्यांनी म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक केली. इतर पर्यायांमध्ये केलेली बचत, गुंतवणूक काढून त्यांनी ती म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात लावली.

गोल्ड ईटीएफमधील पोर्टफोलिओंची संख्या डिसेंबर 2022 पर्यंत 14.29 लाखांनी वाढून ती 46.28 लाख झाली. डिसेंबर 2021 पर्यंत पोर्टफोलिओंची संख्या 32.09 लाख होती. पोर्टफोलिओची संख्या वाढली. पण गुंतवणूक कमी झाली.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.