Infosys Dividend | पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीला लागली लॉटरी, अक्षता मूर्ती यांच्या खात्यात 138 कोटी

Infosys Dividend | इन्फोसिसमुळे ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना लॉटरी लागली. त्यांना मोठी कमाई करता आली. त्यांच्या मालमत्तेत मोठी वाढ झाली. इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या त्या कन्या आहेत. तर सुनक हे त्यांचे जावाई आहेत. यापूर्वी अक्षता यांच्या संपत्तीवरुन इंग्लंडमध्ये वादंग उठले होते.

Infosys Dividend | पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीला लागली लॉटरी, अक्षता मूर्ती यांच्या खात्यात 138 कोटी
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 3:01 PM

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना लॉटरी लागली आहे. भारतातील इन्फोसिसी या कंपनीने त्यांना मोठा फायदा मिळवून दिला. भारतीय आयटी सेक्टरमधील इन्फोसिस ही महत्वाची कंपनी आहे. अवघ्या दहा हजार रुपयांच्या कर्जावर ही कंपनी सुरु करण्यात आली होती. आज या कंपनीचा टर्नओव्हर कित्येक कोटींमध्ये आहे. सुधा मूर्ती यांनी हे कर्ज दिले होते. त्यांचे पती नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची स्थापना केली होती. पुण्यामध्ये ही कंपनी स्थापण्याचे स्वप्न रंगवण्यात आले होते हे विशेष. आता या कंपनीतून अक्षता मूर्ती यांना 138 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

लाभांशाने केले मालामाल

इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषीत केले आहे. यामध्ये कंपनीने योग्य शेअरधारकांना 18 रुपये प्रति शेअरचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. इन्फोसिसच्या घोषणेनंतर 25 ऑक्टोबर 2023 रोजी डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची संपत्ती 2023 मध्ये जवळपास 138 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

इतक्या शेअरच्या मालक

शेअर होल्डर्स पॅटर्ननुसार, अक्षता मूर्ती या इन्फोसिस कंपनीत एक मोठ्या प्रमोटर्स आहेत. त्यांच्याकडे 3,89,57,096 इतके शेअर आहेत. या शेअरनुसार कंपनीत त्यांचा 1.05 टक्के वाटा आहे. 18 रुपयांच्या लाभांशाचा विचार करता, त्यांच्या संपत्तीत 70 कोटींची वाढ झाली आहे.

या वर्षात 138 कोटींनी वाढली संपत्ती

2023 च्या पहिल्या तिमाही निकालात कंपनीने 17.50 रुपये प्रति शेअरचा लाभांश जाहीर केला होता. इन्फोसिसने प्रति शेअर 17.50 रुपयांचे अंतरिम लाभांश 2 जून 2023 रोजी जाहीर केले होते. त्यामुळे अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत 68 कोटी रुपयांची भर पडली होती.

कधी होणार पैसा जमा

आता कंपनीने 18 रुपये प्रति शेअर लाभांश जारी केले आहे. त्यामुळे अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत 70 कोटींहून अधिकची भर पडेल. तर या वर्षात त्यांच्या संपत्तीत 138 कोटी रुपयांची वाढ होईल. 25 ऑक्टोबर ही डिव्हिडेंड रेकॉर्ड डेट आहे. इन्फोसिसने शेअर होल्डर्सला याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत हा पैसा खात्यात जमा होईल.

Non Stop LIVE Update
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?.
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?.
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल.
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक.
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट.
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?.
पुतणे,पवार,पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांचा आजोबांना पाठिंबा
पुतणे,पवार,पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांचा आजोबांना पाठिंबा.
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या... बारसकरांचे जरांगेंवर आरोप
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या... बारसकरांचे जरांगेंवर आरोप.