AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Auto Driver | आता काय म्हणावे या नशीबाला, कंपनीचा मोठा अधिकारी झाला ऑटो ड्रायव्हर

Auto Driver | खेळ कुणाला दैवाचा कळला, हे मराठी गाणं तुम्ही ऐकलं असेलच. जगात केव्हा कुठे आणि कोणासोबत काय होईल हे सांगता येत नाही. आपल्या आजूबाजूला पण अशा अनेक चक्रावून टाकणाऱ्या घटना घडतात. स्टार्टअप सुरु करणाऱ्या सहसंस्थापकाने हा किस्सा शेअर केला आहे. तो अत्यंत धक्कादायक आहे.

Auto Driver | आता काय म्हणावे या नशीबाला, कंपनीचा मोठा अधिकारी झाला ऑटो ड्रायव्हर
| Updated on: Oct 13, 2023 | 2:22 PM
Share

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : प्रत्येकाची काही स्वप्न असतात. काही जण स्वप्न जगतातही पण अचानक असा काही अनाकलनीय घडतं की होत्याचं नव्हतं होतं. अनेक मोठ्या पदावरची माणसं हलाखीचं जीवन कंठतात. राजाचा रंक होतो. तर रंकाचा राव होतो. जगात कुठे, केव्हा आणि काय घडले याची शाश्वती देता येत नाही. असाच एक किस्सा Momoney या स्टार्टअपचे सह संस्थापक मनस्वी सक्सेना यांनी शेअर केला आहे. ज्या ऑटोतून ते प्रवास करत होते. त्या ऑटोचा चालक एक मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्दावर होता. पण परिस्थितीने अशी काही कलाटणी घेतली की, त्याला ऑटो चालवावा लागत आहे. सक्सेना यांना हा धक्का सहन करणं अवघड गेलं, कोण आहे ती व्यक्ती, नेमकं झालं तरी काय?

बेंगळुरुतील किस्सा

बेंगळुरु जणू भारतातील सिलिकॉन व्हॅलची आहे. याठिकाणी प्रत्येक जण काहीतरी स्वप्न उराशी बाळगून प्रगती करतो. नवीन बिझनेस आयडियाज घेऊन अनेक तरुण बेंगळुरुमध्ये दाखल होतात. स्टार्टअप सुरु करतात. फंडिंग मिळवतात. आघाडी घेतात. मोमनीचे सहसंस्थापक मनस्वी सक्सेना यांनी ट्विटरवर (आताचे एक्स) शेअर केलेल्या एका सत्य घटनेने मात्र अनेकांना धक्का बसला.  तो ज्या ऑटोतून प्रवास करत होत्या, त्याचा चालक हा काही दिवसांपूर्वी एका मोठ्या कंपनीचा चीफ ग्रोथ ऑफिसर असल्याचे त्याला समजले.

नशीबाचे फासे पालटले

मनस्वी सक्सेना यांनी हा अनुभव शेअर केला आहे. त्यानुसार, हा ऑटो चालक फिनटेक कंपनी Juspay चे चीफ ग्रोथ ऑफिसर होता. आज रात्री मला घरी नेऊन सोडणारा ऊबरचा ऑटो चालक हा Juspay चा चीफ ग्रोथ ऑफिसर होता. तो युझर्स रिसर्चचे काम करत होता. त्याच्याशी बोलताना त्यांना हा प्रकार समजला. त्यांना धक्का बसला. मनस्वी सक्सेना हे मोमनी या मोबाईल पेमेंट एपचे सहसंस्थापक आहेत.

अचानक झाला खुलासा

उबर ऑटो बुक केल्यावर सहज चर्चा सुरु झाली. ऑटो ड्रायव्हर अत्यंत व्यवस्थित उत्तरं देत असल्याचे पाहून सक्सेना यांनी खोदून माहिती विचारल्यावर हा खुलासा समोर आला. त्यांनी ही बाब एक्सवर पोस्ट केल्यावर ही पोस्ट एकदम व्हायरल झाली. त्यावर लाईक्स, कमेंटचा पाऊस पडला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच