Infosys : या बँकेच्या भरवशावर इन्फोसिसने घेतली भरारी! सुधा मूर्तीं यांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Infosys : दिग्गज IT कंपनी इन्फोसिसचा असा झाला श्रीगणेशा, या बँकेच्या 10 हजारांनी घेतली गरुड झेप, कोणती आहे ही बँक माहिती आहे का

Infosys : या बँकेच्या भरवशावर इन्फोसिसने घेतली भरारी! सुधा मूर्तीं यांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 4:34 PM

नवी दिल्ली : भारताची टॉप IT कंपनी इन्फोसिस सुरु होण्याची गोष्ट अत्यंत रोचक आहे. 10 हजार रुपयांच्या भांडवलावर ही कंपनी सुरु झाली होती. या बँकेने त्यांना फंडिंग केले होते. त्या जोरावर कंपनीचा श्रीगणेशा झाला. सात मित्रांनी मनाचा हिय्या करत त्याकाळी पाटणी सारखी कंपनी सोडून इन्फोसिसचा (Infosys) ब्रँड उभारला. कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांनी याविषयीचा खूलासा केला. The Kapil Sharma Show यांच्या शो मध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला. हे 10 हजार रुपये या बँकेच्या मदतीने त्यांना मिळाले, हे सीक्रेट जाहीर झाले तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

ही बँक धावली 1981 मध्ये सात मित्रांनी मिळून इन्फोसिसची (Infosys Company) स्थापना केली होती. आज या कंपनीने इतिहास रचला. सुधा मूर्ती यांनी पत्र्याच्या डब्ब्यात 10 हजार रुपये जमा केले होते. हीच ती पिग्मी बँक, ज्यातून इन्फोसिसची सुरुवात झाली. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सुधा मूर्ती यांनी घरातील महिला पतीच्या पाठीमागे पैसे साचवतात आणि हे कठीण परिस्थितीत हा पैसा कामी येतो. सुधा मूर्ती यांनी पत्र्याच्या डब्ब्यात पैसा साचविला. याच रक्कमेतून इन्फोसिस सुरु झाली.

सते पे सत्ता एन. आर. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, एन. एस. राघवन, एस. गोपालकृष्णन, एस. डी. शिबूलाल, के. दिनेश आणि अशोक अरोरा यांनी या कंपनीची सुरुवात केली. पाटणी कंम्प्युटर सिस्टमला राम राम ठोकल्यानंतर या सात मित्रांनी आयटी सेवा पुरवठादार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे 10 हजार रुपयांचा निधी होता. आज या कंपनीचे बाजारातील भागभांडवल 1.32 लाख कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीकडे 3.14 लाख कर्मचारी कोणताही मोठा अनुभव गाठीशी नसताना इन्फोसिसने अनेकांना पाणी पाजले. यशाची एक एक पायरी ही कंपनी चढली. 31 मार्च, 2022 रोजी या कंपनीचे बाजारातील भागभांडवल 16.3 अब्ज डॉलर, म्हणजे जवळपास 1.32 लाख कोटी रुपये होते. या कंपनीकडे एकूण 3.14 लाख कर्मचारी होते.

अमेरिकन शेअर बाजारात प्रवेश इन्फोसिसने गेल्या चार दशकात मोठी झेप घेतली. 1999 मध्ये ही कंपनी अमेरिकन स्टॉक एक्सचेंज, Nasdaq वर सूचीबद्ध, लिस्टेड झाली. अशा प्रकारचा इतिहास रचणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली. गेल्या वर्षी जुलैमध्ये इन्फोसिसने कमाल केली. 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक बाजार मूल्य असलेली ही दुसरी भारतीय आयटी कंपनी ठरली आहे.

जोरदार लाभांश कंपनी बोर्डने आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति शेअर 17.50 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी कंपनीने शुद्ध लाभ 9 टक्के वाढून 24,095 कोटी रुपये कमाविला. तर कंपनीचा महसूल 20.7 टक्के वाढून 1,46,767 कोटी रुपये राहिला. इन्फोसिसने मार्च तिमाहीत एकूण 3,43,234 कर्मचारी होते. गेल्या तिमाहीपेक्षा 3,611 कर्मचारी कमी झाले आहेत.

'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर
'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर.
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.