AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापाने साड्या तर मुलाने ट्राऊजर्स विकल्या, अखेर ‘या’ गोष्टीमुळे किशोर बियाणी आहेत रिटेल किंग

खरंतर, SEBI ने फ्यूचर ग्रुपच्या प्रमोटर किशोर बियानी, त्यांचे भाऊ अनिलसह 3 जणांवर सिक्यॉरिटीज मार्केटमध्ये घुसण्यावर एक वर्षाचा रोख लावला आहे.

बापाने साड्या तर मुलाने ट्राऊजर्स विकल्या, अखेर 'या' गोष्टीमुळे किशोर बियाणी आहेत रिटेल किंग
| Edited By: | Updated on: Feb 04, 2021 | 1:29 PM
Share

नवी दिल्ली : फ्यूचर ग्रुपचे प्रमोटर आणि रिटेल किंगच्या नावाने प्रसिद्ध असलेले किशोर बियानी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी किशोर बियानी हे कॅपिटल मार्केट रेग्युलेटर SEBI कडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे चर्चेत आहेत. खरंतर, SEBI ने फ्यूचर ग्रुपच्या प्रमोटर किशोर बियानी, त्यांचे भाऊ अनिलसह 3 जणांवर सिक्यॉरिटीज मार्केटमध्ये घुसण्यावर एक वर्षाचा रोख लावला आहे. सेबीने हा निर्णय 2017 मध्ये त्यांच्या वतीने फ्यूचर समूहासाठी अंतर्गत व्यापार केल्यामुळे घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. (inspiring story of kishore biyani how is retail king facing problems after sebi bans him for insider trading)

सेबीने बियानी आणि त्यांच्या भावावर एक-एक कोटींचा दंडही लावला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सेबीने दिलेल्या आदेशानुसार, फ्यूचर कॉर्पोरेट रिसोर्सेज प्रायव्हेट लिमिटेड, किशोर बियानी, अनिल बियानी, FCRL एंप्लॉयी वेलफेअर ट्रस्ट (FCRLWT), राजेश पाठक आणि राजकुमार पांडे यांना पुढच्या एक वर्षासाठी सिक्यॉरिटीज मार्केट जाऊ शकत नाही. खरंतर, बियाणी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असली तरी त्यांच्या यशाची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे.

मुंबईमध्ये सुरू केला व्यवसाय

किशोर बियानी हे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. पण मोठ्या अथक प्रयत्नांनी त्यांनी या व्यवसायात स्वत: चं साम्राज्य उभं केलं. कर्जामुळे अनेक अडचणी आल्या, जागतिक मंदीच्या वेळी कंपनीची अर्थव्यवस्था ढासळली. पण अशातही त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनत सोडली नाही. म्हणून किशोर बियाणी आज यशाच्या उंच शिखरावर आहेत. राजस्थानमधील रहिवासी असलेले किशोर बियाणी यांनी सुरुवातीला मुंबईत व्यवसाय सुरू केला. याआधी त्यांचे आजोबा हे साडीचा व्यापार करण्यासाठी मुंबईला आले होते. यावेळी त्यांनी दादांसोबतही काम केलं.

ट्राउजरवरून बनले रिटेल किंग

वयाच्या 22 व्या वर्षी किशोर यांनी ट्राउजर बनवण्याचं काम सुरू केलं. सध्या त्यांची कंपनी पँटालून संपूर्ण जगात टॉपवर बिझनेस करत आहे. 1987 मध्ये व्यवसायात उतरल्यानंतर किशोर हे रोजच्या मार्केटवर राज्य केलं. पण 2008 नंतर त्यांची अवस्था अंत्यत बिकट होती. 2008 मध्ये जागतिक मंदी आल्यामुळे फ्यूचर ग्रुपचं कर्ज वाढत गेलं आणि 2009 मध्ये त्यांनी मॅनेजमेंट कंसल्टिंग कंपनी मॅकेंजीची सेवा घेतली.

यानंतर 2012 मध्ये त्यांनी पँटालून ते जास्तीत जास्त शेअर आदित्य बिर्लाला विकले. मिळालेल्या माहितीनुसार, ही डील 1,600 कोटी रुपयांची होती. ज्यामध्ये 800 कोटी रुपये कर्जामध्ये गेले. यानंतर त्यांनी अॅमेझॉनलाही आपले काही शेअर्स विकले. तेव्हाही किशोरी बियाणी यांची जोरदार चर्चा सुरू होती. (inspiring story of kishore biyani how is retail king facing problems after sebi bans him for insider trading)

संबंधित बातम्या – 

रोज फक्त 10 रुपयांच्या बचतीवर 60 हजार रुपये पेन्शन मिळवा, खूप फायद्याची आहे सरकारी योजना

Gold Price Today : ऐन लग्नसराईच्या तोंडावर पुन्हा स्वस्त झालं सोनं, इथे वाचा आजचे ताजे दर

अमित शहांनी ‘या’ योजनेत गुंतवले 9 लाख, जबरदस्त आहे फायदा आणि व्याजदर

50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा सोनं, 5 फेब्रुवारीपर्यंत सरकारची खास योजना

(inspiring story of kishore biyani how is retail king facing problems after sebi bans him for insider trading)

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.