अमित शहांनी ‘या’ योजनेत गुंतवले 9 लाख, जबरदस्त आहे फायदा आणि व्याजदर

आपल्याला कधी मोठ्या रक्कमेची आवश्यकता भासेल याचं काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने थोडीफार का होईना गुंतवणूक केली पाहिजे. ज्याने तुम्हाला चांगला नफा आणि उत्तम परतावाही मिळेल.

अमित शहांनी 'या' योजनेत गुंतवले 9 लाख, जबरदस्त आहे फायदा आणि व्याजदर

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या काळात आपल्या सगळ्यांनाच गुंतवणुकीचं महत्त्व कळलं आहे. सध्या बाजारातही छोट्या गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहे. आपल्याला कधी मोठ्या रक्कमेची आवश्यकता भासेल याचं काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने थोडीफार का होईना गुंतवणूक केली पाहिजे. ज्याने तुम्हाला चांगला नफा आणि उत्तम परतावाही मिळेल. (home minister amit shah invest in fixed deposit scheme here know the benefits of fixed deposit and interest rates)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात अनेक बड्या मंडळींनीही गुंतवणूक केली आहे. यातलंच एक नाव म्हणजे गृहमंत्री अमित शहा. अमित शहा यांनी अनेक बँकांमध्ये गुंतवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा यांनी तब्बल 9 लाखांहून अधिक रक्कम बँकेमध्ये एफडीच्या स्वरुपात म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट (FD) म्हणून ठेवली आहे. यासंबंधी www.pmindia.gov.in वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

काय आहे फिक्स्ड डिपॉझिट योजना?

गुंतवणुकीचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit). ही एक ट्रेडिशनल सेव्हिंग योजना (Traditional Savings Scheme) आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे लावण्यासाठी नेहमी तयार असतात. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटवर सरकारी गॅरंटी मिळते. FD वर व्याज (Fixed deposit Interest rates) वार्षिक आधारे द्यावं लागतं. पण व्याजदराची मोजणी (How to calculate FD interest rate) तिमाही आधारवर केली जाते. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कुठल्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जाऊ शकता.

बँक FD आणि पोस्ट ऑफिस टाईन डिपॉझिटमध्ये अंतर

कोणत्याही बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट केलं जाऊ शकतं. एसबीआयसह अनेक बँकांमध्ये ऑनलाईन एफडी खात्याची सुविधाही उपलब्ध आहे. लक्षात असू द्या की बँकेमध्ये तुम्ही 7 दिवसांपासून ते जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत FD करू शकता. तर पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटमध्ये कमीत कमी 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता.

बचत खात्याच्या तुलनेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांना जास्तीचं व्याजही मिळतं. बँकांच्या मते FD चे दर हे नेहमी बदलत असतात. सगळ्यात विशेष म्हणजे FD (Fixed deposits) वर ज्येष्ठांना सगळ्यात जास्त व्याज मिळतं. सामान्य जनतेच्या तुलनेत ज्येष्ठांना 0.5 टक्के अतिरिक्त व्याज मिळतं. यामुळे जाणून घेऊयात SBI बँक FD वर किती टक्के व्याज देते?

SBI मधील FD वर व्याज

* 7-45 दिवस – 2.90 टक्के व्याज

* 46-179 दिवस – 3.90 टक्के व्याज

* 180 दिवस – 1 वर्ष – 4.40 टक्के व्याज

* 1-2 वर्ष – 4.90 टक्के व्याज

* 2-3 वर्ष – 5.10 टक्के व्याज

* 3-5 वर्ष – 5.30 टक्के व्याज

* 5-10 वर्ष – 5.40 टक्के व्याज

SBI ज्येष्ठांना 0.5 टक्क्यांनी अतिरिक्त व्याज देते. तर ज्येष्ठांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत 6.2 टक्क्यांनी व्याज मिळतं.

पोस्ट ऑफिसमध्ये टाईम डिपॉझिट

पोस्ट ऑफिसमधील टाईम डिपॉझिट योजनाही एफडीप्रमाणेच आहे. ज्यामध्ये तुम्ही 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसकडून टाईम डिपॉझिटवर देण्यात आलेले नवे व्याजदर एक जानेवारी 2021 मध्ये लागू करण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिस एक वर्षाच्या कालावधीसाठी ग्राहकांना 5.5 टक्के व्याज देत आहे. तर 2 ते 3 वर्षाच्या गुंतवणुकीवर याच दराने व्याज दर मिळेल. यामध्ये तुम्ही 5 वर्षांची गुंतवणूक केली असता यावर 6.7 टक्के व्याज मिळेल. (home minister amit shah invest in fixed deposit scheme here know the benefits of fixed deposit and interest rates)

संबंधित बातम्या –

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती खिसा कापणार, वाचा आजचे दर

50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा सोनं, 5 फेब्रुवारीपर्यंत सरकारची खास योजना

ICICI च्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा धक्का, कोर्टाकडून पोस्टचा गैरवापर केल्याचं स्पष्ट

(home minister amit shah invest in fixed deposit scheme here know the benefits of fixed deposit and interest rates)

Published On - 11:01 am, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI