AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office च्या योजनांवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार झाले फिदा

Post Office | कोरोनानंतर गुंतवणूक वाढविण्याचा कल वाढल्याचे समोर आले आहे. कोविडने नागरिकांच्या कमाईला सुरुंग लावला होता. अनेकांच्या लक्षात आले की, कोरोना काळात त्यांच्याकडे बचतच नाही. त्यांनी कोणत्याच योजनेत गुंतवणूक केलेली नाही. त्यामुळे अनेकांनी सुरक्षित आणि चांगला पर्याय निवडला. त्यात टपाल खात्याच्या योजना पण पसंतीच्या ठरल्या.

Post Office च्या योजनांवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार झाले फिदा
| Updated on: Dec 24, 2023 | 11:11 AM
Share

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : महागाईच्या चिंतेमुळे भविष्यात गाठीशी काही रक्कम राहावी, अडचणीच्या काळात बचत उपयोगी पडावी यासाठी बचतीचे महत्व वाढले आहेत. सुरक्षित आणि चांगला पर्याय म्हणून टपाल खात्याच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांवर नागरिकांचा भरवसा असल्याचे सिद्ध झाले आहे. मनी9 ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात बचत करणाऱ्या कुटुंबाची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये 70% कुटुंब बचत करत होते. तर आता हा आकडा 2023 मध्ये 88% पर्यंत वाढला आहे.

पैशांची बचत करण्यावर जोर

बचत करणाऱ्या कुटुंबाची संख्या वाढली आहे. तसेच बचतीच्या पद्धतीत पण बदल झाला आहे. सध्याच्या काही आकड्यांनी याविषयीची माहिती समोर आणली आहे. बँकेत रक्कम जमा करणाऱ्यांची संख्या 2022 च्या तुलनेत 77% पर्यंत वाढली आहे. यापूर्वी हा आकडा 64% इतका होता. बँकेतील बचतीवर व्याज वाढल्याने ही संख्या वाढल्याचे समोर येत आहे. 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याचा निर्णय पण त्यासाठी कारणीभूत मानण्यात येत आहे. कारण या काळात अनेक लोकांनी गुलाबी नोटा बचत खात्यात, एफडी स्वरुपात जमा केल्याचे समोर आले आहे.

विमा खरेदीत वाढ

देशातील नागरिकांचा सर्वाधिक कल विमा खरेदीकडे असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात उपचारांसाठी मोठी रक्कम खर्ची पडल्याने नागरिकांनी आता विम्याचा पर्याय निवडला आहे. गेल्या वर्षात 19% कुटुंबांनी विमा खरेदी केली. तर 2023 मध्ये सर्वेक्षण समोर आले आहे, त्यानुसार, विमा खरेदीदार कुटुंबियांचा आकडा 27% पर्यंत वाढला आहे. विमा खरेदी तेजीने होत असल्याचे समोर आले आहे.

पोस्ट ऑफिस नवीन ट्रेंड

बचतीचा नवीन ट्रेंड समोर येत आहे. टपाल खात्यातील योजनेत बचत करण्यावर भर देण्यात येत आहे. पोस्ट कार्यालयाच्या वेगवेगळ्या अल्पबचत योजनेत पैसा जमा करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढल्याचे समोर येत आहे. 2022 मध्ये अशी कुटुंब 21% होती. यंदा, 2023 मध्ये हा आकडा 31% पर्यंत वाढला आहे. या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळत असल्याने नागरिक या योजनांकडे वळले आहेत. तर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबाची संख्या 15% हून 21 टक्क्यांवर पोहचली आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.