AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Share : 7 रुपयांचा शेअर,फायदा सात पट ; प्रत्येक महिन्याला 40 टक्क्यांचा रिटर्न

हा शेअर सतत सहा महिने तेजीवर स्वार आहे. डिसेंबर 2023 मध्ये या चवन्नी शेअरची किंमत 7.75 रुपये होती. आता हा स्टॉक 55.46 रुपयांवर पोहचला आहे. 6 महिन्यांहून कमी वेळात या शेअरने तुफान घौडदौड केली आहे. गुंतवणूकदारांचा पैसा सात पट वाढवला आहे.

Multibagger Share : 7 रुपयांचा शेअर,फायदा सात पट ; प्रत्येक महिन्याला 40 टक्क्यांचा रिटर्न
गुंतवणूकदारांची गरिबी केली दूर
| Updated on: May 09, 2024 | 10:54 AM
Share

शेअर बाजारात अनेक गुंतवणूकदार दमदार पेनी शेअर शोधतात. कारण आज ज्या नामचिन कंपन्या आहेत. त्यांचे शेअर कधीकाळी आजच्या मानाने स्वस्त होते. ज्यांनी त्यावेळी गुंतवणूक केली. ते आज मालामाल झाले आहेत. पेनी स्टॉक कमी किंमतीत मिळतो आणि भविष्यात मोठा रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. योग्य पेनी स्टॉक मिळाल्यास या संधीचे मोठं सोनं होतं. या 7 रुपयांच्या स्टॉकने अशीच कमाल कामगिरी करुन दाखवली आहे. तो वधारुन आता 55 रुपयांपर्यंत पोहचला आहे.

5 महिन्यात जबरदस्त रिटर्न

  1. मार्सन्स लिमिटेडच्या शेअरने भरभक्कम कामगिरी करुन दाखवली. डिसेंबर 2023 मध्ये हा स्टॉक केवळ 7.75 रुपयांवर होता. त्यानंतर त्याने मोठी झेप घेतली. हा स्टॉक 55.46 रुपयांवर पोहचला. यावर्षी जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत या शेअरने 600 टक्क्यांची भरारी घेतली आहे. म्हणजे या 6 महिन्यात या शेअरने 6 पट रिटर्न दिला आहे.
  2. एका वर्षात या शेअरने 8 टक्क्यांनी जास्त रिटर्न दिला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचा चेहरा खुलला आहे. हा स्टॉक 25 जुलै 2023 रोजी 52 आठवड्यातील निच्चांकावर 4.95 रुपयांवर होता. आता तो 998.5 टक्के वधारला आहे.
  3. मार्सन्स लिमिटेडच्या शेअरमध्ये सलग पाचव्या महिन्यात तेजी दिसून आली. एप्रिल महिन्यात हा स्टॉक जवळपास 37 टक्के, मार्च महिन्यात 39 टक्के, फेब्रुवारी महिन्यात 45 टक्के आणि जानेवारी 2024 मध्ये या मल्टिबॅगर स्टॉकने 135.5 टक्क्यांचा जोरदार परतावा दिला. मे महिन्यात आतापर्यंत या स्टॉकने 8 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे.

1 वर्षापूर्वी 53 रुपये भाव

दुसरी एक कंपनी जय बालाजी कंपनीचा शेअर 25 एप्रिल 2023 रोजी 53.03 रुपये प्रति शेअर असा होता. आता हा शेअर 1,085 रुपयांवर पोहचला होता. तो आता घसरुन 967 रुपयांवर आला आहे. एका वर्षाचा विचार करता या शेअरने 1084 टक्क्यांचा परतावा दिला आहे.गेल्या महिनाभरात या शेअरने 16.89 टक्क्यांचा परतावा दिला. याशिवाय सहा महिन्यात या शेअरने 87.21 टक्क्यांची चढाई केली. एका वर्षात कंपनीचे मार्केट कॅप 771.32 कोटी रुपयांहून 18,744.48 कोटी रुपयांवर पोहचले.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.