AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock : 13 रुपयांचा शेअर, 11 टक्क्यांची तेजी, रिलायन्सची एक खेळी, गुंतवणूकदारांची अशी भरेल झोळी

Multibagger Stock : रिलायन्सच्या एका खेळीने या कंपनीचा स्टॉक एकदम वधारला आहे. 13 रुपयांचा हा शेअर सध्या तेजीच्या लाटेवर स्वार आहे. त्यात गुंतवणूकदारांची झोळी भरणार आहे.

Multibagger Stock : 13 रुपयांचा शेअर, 11 टक्क्यांची तेजी, रिलायन्सची एक खेळी, गुंतवणूकदारांची अशी भरेल झोळी
| Updated on: Mar 15, 2023 | 7:16 PM
Share

नवी दिल्ली : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे साम्राज्य सारखं विस्तारत आहे. अनेक दिग्गज ब्रँड रिलायन्स समूहाने (Reliance Group) त्यांच्या पंखाखाली घेतले आहे. बंद पडण्याच्या स्थिती असणारी, बंद पडलेल्या कंपन्यांचं, ब्रँड रिलायन्सनने सोनं केले आहे. रिलायन्स या कंपन्यांसाठी एक प्रकारे परिस ठरला आहे. केवळ देशातच नाही तर रिलायन्स त्यांचा विस्तार आता परदेशातही करत आहे. परदेशातही अनेक कंपन्या अधिग्रहणासाठी बोलणी सुरु आहे. दरम्यान रिलायन्सने आता टेक्सटाईलमध्ये (Textile Industry) दबदबा तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. रिटेल बाजारात सध्या रिलायन्सने धुमाकूळ घातला आहे. टेक्साटाईलमध्ये पण रिलायन्सचा लवकरच बोलबाला होणार आहे.

शेअर बाजारातील सुचीबद्ध, आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने (Alok Industries Ltd Share) बुधवारी तुफान बॅटिंग केली. दोन दिवसांपासून शेअर बाजारात भयकंप आहे. बाजार धडाधड कोसळत असताना या कंपनीने धुवांधार बॅटिंग केली. ट्रेडिंग काळात हा शेअर 11 टक्क्यांहून वधारला आणि 13.67 रुपयांवर पोहचला. नफा कमविण्यासाठी यामध्ये विक्री सत्र सुरु झाले. हा शेअर 13 रुपयांपर्यंत घसरला.

हा शेअर 11 एप्रिल 2022 रोजी 52 आठवड्यांच्या उच्चांकीस्तरावर 29.80 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर हा शेअरमध्ये विक्रीचे सत्र थांबता थांबले नाही. हा शेअर 22 फेब्रुवारी 2023 रोजी घसरुन 10.07 रुपयांवर आला. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील निच्चांकी स्तर होता. बीएसई निर्देशांकावर गेल्या वर्षभराचा विचार करता, सध्या या शेअरने निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. मंगळवारी वार्षिक आधारावर 44.43 टक्के असा नकारात्मक परतावा या शेअरने दिला आहे. सहा महिन्यात या शेअरने 33 टक्के तर 3 महिन्यात जवळपास 18 टक्के निगेटिव्ह रिटर्न या शेअरने दिला आहे.

आलोक इंडस्ट्रीज ही कंपनी 2019 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने खरेदी केली आहे. ही कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. ही कंपनी त्यावेळी रिलायन्सने 5,000 कोटी रुपयात संपादित केली होती. आलोक इंडस्ट्रीजच सिलवासा, वापी, नवी मुंबई आणि भिवंडीत फॅक्टरी आहे. याठिकाणी वार्षिक 68,000 टन सूती धागा आणि 1.7 लाख टन पॉलिस्टरचे उत्पादन होते. रिलायन्स आता टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज दबदबा तयार करणार आहे. त्यासाठी त्यांनी एक एक पाऊल टाकले आहे.

आता रिलायन्सने शुभलक्ष्मी पॉलिस्टर्स लिमिटेड आणि शुभलक्ष्मी पॉलिटेक्स लिमिटेड या दोन कंपन्यांचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. रिलायन्स पॉलिस्टर लिमिटेडने हा करार पूर्ण केला. शुभलक्ष्मीच्या गुजरात मधील दाहेज आणि दादरा आणि नगर हवेली येथील सिलवासा या ठिकाणी फॅक्टरी आहेत. यापूर्वी रिलायन्सने सिंटेक्स इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केले आहे.

टेक्सटाईलमधील या घडामोडी, आलोक इंडस्ट्रीजच्या शेअरवर मोठे परिणाम करणारे ठरु शकतात. ही या शेअर आणि त्यासंबंधीच्या घडामोडींची माहिती आहे. हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करताना अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला वेळीच घ्या.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...