आयफोन 17 प्रो व 17 प्रो मॅक्स स्वस्तात खरेदीची संधी, अमेझॉन सेलमध्ये मिळणार मोठी सूट
अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 दरम्यान आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन एअरवर पहिल्यांदाच सूट दिली जाईल. सेल सुरू होण्यापूर्वीच सेल दरम्यान हे मॉडेल्स कोणत्या किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध होतील ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 सुरू होणार आहे. दरम्यान सेल सुरू होण्यापूर्वीच काही उत्पादनावरील डील्स उघड होत आहेत. विशेष म्हणजे हा सेल ॲपल प्रेमींसाठी खूप खास असेल, कारण पहिल्यांदाच आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन एअरच्या किमतीत लक्षणीय कपात केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर आयफोन 17 सीरिजमधील मॉडेल खरेदी करायचा असेल तर ही उत्तम संधी आहे. सेल दरम्यान तिन्ही मॉडेल्स मोठ्या सवलतीत उपलब्ध होणार आहे. चला तर आजच्या लेखात आपण Amazon सेल मायक्रोसाइटवर सांगितल्या प्रमाणे हे तिन्ही मॉडेल्स कोणत्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत ते जाणून घेऊयात.
आयफोन 17 प्रो ची भारतातील किंमत
आयफोन 17 प्रो व्हेरिएंटचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या अमेझॉनवर 1 लाख 34 हजार 900 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे, मात्र सेल दरम्यान या आयफोनची एकदा विक्री सुरू झाली की तुम्हाला हे मॉडेल बँक ऑफर्ससह 1 लाख 25 हजार 400 रूपयांमध्ये खरेदी करता येईल. याचा अर्थ असा की तुम्ही सेल दरम्यान या फोनवर 9 हजार 500 रुपयांची बचत करू शकता.
आयफोन 17 प्रो मॅक्सची भारतातील किंमत
या फ्लॅगशिप मॉडेलचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या विक्री सुरू होण्यापूर्वी 1 लाख 49 हजार 900 रूपयांमध्ये विकला जात आहे. तथापि विक्री दरम्यान हाच फोन बँक ऑफर्ससह 1 लाख 40 हजार 400 रूपयांमध्ये विक्री करीता उपलब्ध असेल.
भारतात आयफोन एअरची किंमत
आयफोन एअर या स्लिम आयफोनचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या 99 हजार रूपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे, मात्र बँक ऑफर्ससह तुम्ही हा हँडसेट 91 हजार 249 रूपयांमध्ये खरेदी करू शकाल. याचा अर्थ असा की तुम्ही सेल दरम्यान या फोनवर 7 हजार 751 रूपयांची बचत करू शकता.
अशा प्रकारे अतिरिक्त बचत होईल
बँक ऑफर्ससह, तुम्हाला वर उल्लेख केलेले मॉडेल स्वस्त मिळतील. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून एक्सचेंज डिस्काउंटद्वारे अतिरिक्त बचत देखील करू शकाल. ग्राहकांच्या सोयीसाठी सेल दरम्यान नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे या सेल दरम्यान आयफोन प्रेमींना आयफोन स्वस्तात खरेदी करता येईल.
