रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ट्रेनमध्ये आता फक्त शाकाहारी भोजनच मिळणार

Indian Railway | भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ही पहिलीच वेळ आहे की एजन्सी आणि त्याच्या विक्रेत्यांद्वारे प्रदान केलेले शाकाहारी खाद्यपदार्थ प्रमाणित आहेत.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ट्रेनमध्ये आता फक्त शाकाहारी भोजनच मिळणार
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 11:24 AM

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच रेल्वे प्रवाशांना शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल, परंतु ही सुविधा निवडक मार्गांवर उपलब्ध असेल. रेल्वेची तिकीट आणि खानपान उपकंपनी IRCTC काही गाड्यांना ‘सात्विक प्रमाणित’ करून ‘शाकाहारी अनुकूल प्रवासाला’ प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे.

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) पहिल्यांदाच एजन्सी आणि त्याच्या विक्रेत्यांद्वारे प्रदान केलेले शाकाहारी खाद्यपदार्थ प्रमाणित केले जातील.

‘या’ ट्रेन्समध्ये सुरु होणार सेवा

भारतीय सात्विक परिषदेने दिलेल्या निवेदनानुसार, धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर शाकाहारी भोजन सेवा सुरू करण्यासाठी आणि शाकाहारी भोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी IRCTC सोबत करार केला आहे. दिल्ली ते कटरा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ही सेवा सर्वप्रथम सुरु होऊ शकते. दिल्ली-कटरा ट्रेनचा शेवटचा थांबा वैष्णोदेवी मंदिर आहे. कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, नव्याने सुरू झालेल्या रामायण एक्सप्रेससह सुमारे 18 इतर गाड्यांमध्ये ही सेवा सुरु होऊ शकते.

भारतीय सात्विक परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘शाकाहारासाठी अनुकूल प्रवास’ सुनिश्चित करण्यासाठी IRCTC बेस किचन, एक्झिक्युटिव्ह लाउंज, बजेट हॉटेल्स, फूड प्लाझा, ट्रॅव्हल आणि टूर पॅकेजेस, रेल नीर प्लांट्स यांना ‘सात्विक’ प्रमाणित केले जाईल. ते 15 नोव्हेंबर रोजी IRCTC सोबत ‘सात्विक’ प्रमाणन योजना सुरू करेल.

‘सात्विक’ प्रमाणित होण्याची शक्यता असलेली पहिली ट्रेन दिल्ली ते कटरा वंदे भारत एक्सप्रेस आहे. दिल्ली-कटरा ट्रेनचा शेवटचा थांबा वैष्णोदेवी मंदिर आहे. नव्याने सुरू झालेल्या रामायण एक्सप्रेससह सुमारे 18 इतर गाड्यांमध्ये ही सेवा सुरु केली जाऊ शकते.

रेल्वे लवकरच Special Trains थांबवणार

कोरोना संकटाच्या काळात आणि त्यानंतरही प्रदीर्घ काळ भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या. यावेळी बहुतांश एक्सप्रेस आणि मेल गाड्या रुळावर आल्यात. त्यापैकी एक चतुर्थांश गाड्या अजूनही विशेष गाड्यांच्या श्रेणीत धावत आहेत. लवकरच या विशेष गाड्या बंद करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले. विशेष ट्रेनमधील प्रवाशांना सामान्य गाड्यांपेक्षा 30 टक्के जास्त भाडे द्यावे लागते.

संबंधित बातम्या:

PMAY-G: घर बांधण्यासाठीच्या कर्जावर सरकारकडून अनुदान; जाणून घ्या योजनेचा फायदा?

आता संसदेची ‘चव’ बदलणार; 52 वर्षांपासून रेल्वेकडे असणारे कँटीनचे कंत्राट आयटीडीसीला

संसदेत आता फक्त शाकाहारी जेवण, IRCTC चं कँटिन बंद होण्याची शक्यता