संसदेत आता फक्त शाकाहारी जेवण, IRCTC चं कँटिन बंद होण्याची शक्यता

संसदेतील कँटिनमध्ये आता फक्त शाकाहारी जेवण मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रेव्ले अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) लवकरच संसदेतील कँटिन बंद करणार आहे.

Parliament Canteen To Go Vegetarian, संसदेत आता फक्त शाकाहारी जेवण, IRCTC चं कँटिन बंद होण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेतील कँटिनमध्ये आता फक्त शाकाहारी जेवण मिळण्याची शक्यता आहे (Parliament Canteen To Go Vegetarian). भारतीय रेल्वे अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) लवकरच संसदेतील कँटिन बंद करणार आहे. त्यामुळे IRCTC च्या जागी बिकानेर आणि हल्दीराम सारख्या कंपन्यांशी केटरिंग सेवेबाबत चर्चा सुरु आहे. केटरिंगसाठी इतर पर्यायांना पाहता संसदेत खासदारांना आता फक्त शाकाहारी जेवण मिळणार असल्याची चिन्हे आहेत. कारण हल्दीराम आणि बिकानेर सारख्या कंपन्या शाकाहारी जेवण पुरवतात (Parliament Canteen To Go Vegetarian).

IRCTC ला गेल्या काही महिन्यांपासून अन्नाची गुणवत्ता, दर आणि अनुदानाची मागणी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे संसदेतील IRCTC चं कँटिन लवकरच बंद करण्यात येणार आहे. या जागी बिकानेर किंवा हल्दीरामपैकी एकाची निवड होणार असल्याची माहिती आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला संसदीय अन्न समितीच्या अनुपस्थितीत या संदर्भात निर्णय घेऊ शकतात.

संसदेतील कँटिनमधील मेन्यू नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतंच IRCTC च्या मेन्यूमध्ये बदल करण्यात आला. कँटिन मेन्यूमध्ये बिर्याणी, चिकन कटलेट, मासे आणि मांसाहारी पदार्थ प्रामुख्याने घेण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, खिचडी, पोंगल, फळ आणि फळांचा रस यांसारखे आरोग्यदायी पदार्थांचा पर्यायही मेन्यूमध्ये ठेवण्यात आला आहे.

मात्र, IRCTC चं संसदेतील कँटिन बंद होणार की नाही यावर अद्याप कुठलाही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, अन्नाची गुणवत्ता आणि अनुदानाच्या मागणीला पाहता यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

Parliament Canteen To Go Vegetarian

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *