RBI Repo Rate : व्याजदर वाढविण्याशिवाय खरंच RBI कडं नाही दुसरा पर्याय, पण महागाईवर खरंच लागेल लगाम?

RBI Repo Rate : यावेळी आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. ही दरवाढ झाली तर देशात रेपो दर गेल्या 7 वर्षांतील सर्वात उच्चांक गाठेल.

RBI Repo Rate : व्याजदर वाढविण्याशिवाय खरंच RBI कडं नाही दुसरा पर्याय, पण महागाईवर खरंच लागेल लगाम?
पुन्हा झटका
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 10:35 AM

नवी दिल्ली : महागाईसाठी (Inflation) सर्वसामान्यांनी तयार रहावे, त्यांना आता पुन्हा दरवाढीचा एक झटका सहन करावा लागणार आहे. त्यांच्या वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यात (Loan EMI) वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुखाचे दिवस अजून तरी येणार नाहीत, हे नक्की. गेल्या वर्षभरापासून महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ करत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरु झाली आहे. 6 एप्रिल रोजी बैठक समाप्तीनंतर रेपो दरात वाढीची घोषणा होऊ शकते. यावेळी आरबीआय 25 बेसिस पॉईंटने रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

तर उच्चांकी वाढ

जर यावेळी रेपो दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षांत फेब्रुवारी महिन्यात ही रेपो दरात वाढ करण्यात आली होती. आता रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. एमपीसीची बैठक 3 एप्रिल पासून सुरु झाली. . मे 2022 सुरु असलेल्या व्याज दर वृ्द्धीच्या चक्रातील ही अखेरची वाढ असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या दरवाढीमुळे रेपो रेट 7 वर्षांतील उच्चांकावर पोहचेल.

हे सुद्धा वाचा

फेब्रुवारीत झाली होती वाढ

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने गेल्या वर्षी मे 2022 पासून सातत्याने रेपो दरात वाढीचा धडाका लावला आहे. या संपूर्ण चक्रात रेपो दर 4 टक्क्यांहून वाढून 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

ग्राहक निर्देशांक किती

ग्राहक मूल्य निर्देशाकावर (CPI) आधारीत महागाई जानेवारी 6.52 टक्के तर फेब्रुवारी महिन्यात 6.44 टक्के होती. अजूनही किरकोळ महागाई आरबीआयच्या 6 टक्के या प्रमाणित धोरणापेक्षा अधिक आहे. परिणामी आता रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. एमपीसीची बैठक 3 एप्रिल पासून सुरु होत आहे

कारणं तरी काय

महागाई- भारतात किरकोळ महागाई निर्देशांक 6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जानेवारी ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत महागाई जवळपास 6.50 टक्के आहे. आरबीआयसाठी हा मोठा चिंतेचा विषय आहे.

जगात हाच ट्रेंड- अमेरिकेसह युरोपातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 0.25 टक्के वाढ केली आहे. तर ब्रिटनच्या केंद्रीय बँकेने 25 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. युरोपियन बँकेने क्रेडीट सुईस संकटानंतर 50 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

कच्चे तेल- ओपेक आणि रशियाने कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात केली आहे. सौदी अरबने प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला. इराकने प्रति दिवस 211,000 बॅरल, संयुक्त अरब अमिरातने 144,000 बॅरल प्रति दिवस, कुवेतने 128,000 बॅरल प्रत्येक दिवशी, अल्गेरिया 48 हजार बॅरल तर ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली. आज हा भाव 85 डॉलरच्या घरात आहे.

अवकाळी पाऊस- मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशात अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे गहू,फळ, पालेभाज्या यांचे मोठे नुकसान झाले. याचा महागाईवर मोठा परिणाम होत आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयसमोर रेपो दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही.

महागाईचा मूड काय

देशात येत्या काही महिन्यात महागाई कमी होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. एप्रिल आणि मे महिन्यात महागाईवर लगाम लागण्याची शक्यता नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता पण मावळली आहे. गेल्या मे महिन्यात करात कपात करण्यात आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत होता. गेल्या तीन महिन्यांपासून कच्चा तेलाचे भाव घसरणीवर होते. आत कच्चा तेलाने उसळी घेतली आहे. त्यामुळे महागाईचा मूड इतक्या लवकर बदलेल असे वाटत नाही.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.