Railway: जनशताब्दी आता हिंगोलीपासून सुरु होणार, परभणीला वगळणार, थेट जालन्याचे स्टेशन

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Sep 27, 2021 | 11:02 AM

जालन्यातून औरंगाबादपर्यंत या रेल्वेला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे आता हिंगोलीहून सुरु केल्यास रेल्वेला जास्त चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाला वाटत आहे.

Railway: जनशताब्दी आता हिंगोलीपासून सुरु होणार, परभणीला वगळणार, थेट जालन्याचे स्टेशन
जालन्यापासून मुंबईपर्यंत जाणारी जनशताब्दी आता हिंगोलीपासून धावण्याची शक्यता

औरंगाबाद: मराठवाड्यातील लोकांना मुंबईपर्यंत भरधाव वेगाने पोहोचवणारी जनशताब्दी एक्सप्रेस (Jan Shatabdi Express) आता जालन्याऐवजी हिंगोली ते मुंबई अशी धावणार आहे. यामागे रेल्वे प्रशासनाला जास्त आर्थिक लाभ होईल, असा उद्देश आहे. औरंगाबाद ते मुंबई (Aurangabad to Mumbai Rail way) प्रवास करण्यासाठी सर्वात कमी वेळ घेणारी ही रेल्वे असल्यामुळे जनशताब्दीला जास्तीत जास्त प्रवाशांचा प्रतिसाद होता. मात्र ही रेल्वे हिंगोलीपासून सुरु करण्याची मागणीही गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. आता या मागणीची पूर्तता येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे.

… तर तिसऱ्यांदा होईल जनशताब्दीचा विस्तार

मराठवाड्यातील जनतेला एका दिवसात मुंबईतील काम करून परत येण्यासाठी जनशताब्दी ही रेल्वे सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला ही रेल्वे औरंगाबाद ते सीएसटीएमपर्यंत होती. तांत्रिक अडचणींमुळे पुढे ही रेल्वे दादरपर्यंतच नेण्यात येऊ लागली. तर दुसऱ्यांदा या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून ही रेल्वे जालन्यापासून धावतेय. मात्र जालन्यातून औरंगाबादपर्यंत या रेल्वेला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे मोजक्या प्रवाशांसह या गाडीचा औरंगाबादपर्यंत प्रवास होतो, असे रेल्वेच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. औरंगाबाद स्टेशनवरून मात्र या गाडीला भरपूर प्रतिसाद आहे. त्यामुळे आता जालन्याच्याही पुढे जात ही रेल्वे हिंगोलीहून सुरु केल्यास रेल्वेला जास्त चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाला वाटत आहे.

हिंगोलीहून जनशताब्दी धावल्यास वेळ काय असेल?

जनशताब्दी सुरु झाली होती तेव्हा तिची वेळ औरंगाबादहून सकाळी सहा वाजता होती. मात्र काही दिवसांपासून ती औरंगाबादहून सव्वा नऊ वाजता निघते. आता हिंगोलीपासून जनशताब्दी धावू लागल्यास ती हिंगोलीहून पहाटे 4.30 वाजता निघेल आणि दुपारी 4.30 वाजता मुंबईत पोहोचेल.

औरंगाबादकरांचा हिरमोड, दुसऱ्या रेल्वेची मागणी होऊ शकते

पूर्वी पहाटेच असलेली जनशताब्दी एक्सप्रेस औरंगाबादकरांसाठी खूप फायद्याची होती. येथील उद्योजक, व्यावसायिकांसाठी एका दिवसात मुंबईवरून परतण्यासाठी या ट्रेनलाच प्रवाशांची जास्त पसंती मिळत होती. मात्र आता औरंगाबादहून तिची वेळ 9.15 पासून असल्यामुळे प्रवाशांचा दिवस वाया जातो. या बदललेल्या वेळेमुळे प्रवासी जनशताब्दी ऐवजी राज्यराणी एक्सप्रेसने मुंबई गाठत आहेत. त्यामुळे आता औरंगाबादसाठी दुसऱ्या रेल्वेची मागणी जोर धरू शकते, असा अंदाज रेल्वे संघटनेचे अध्यक्ष अरुण मेघराज यांनी व्यक्त केला आहे.

जनशताब्दीचे नियोजित वेळापत्रक कसे असेल?

हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस- हिंगोली (पहाटे 4.30), वसमत-पूर्णा-परभणीमार्ग जालना (8.20), औरंगाबाद (09.15), मनमाड (11.15), नाशिक रोड 12.17), ठाणे (दुपारी 03.23), मुंबई (दुपारी 04.20)

मुंबई ते हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई (12.10), ठाणे (12.43), नाशिक रोड (दुपारी 03.35), मनमाड (दुपारी 04.45), औरंगाबाद (सायंकाळी 06.25), जालना (संध्याकाळी 07.45), परभणी-पूर्णा-वसमतमार्गे हिंगोली (रात्री 11.45) (Jan shatabdi Express likely to run from Hingoli to Mumbai. The railway administration may get more response for this route)

इतर बातम्या- 

चांगली बातमी! रांग न लावता मोबाईल अॅपमधून सहज हिंदीत रेल्वे तिकिटे बुक करता येणार, जाणून घ्या

काय सांगता? मराठवाड्यातून बुलेट ट्रेन धावणार? चव्हाण म्हणतात, पंतप्रधानांना पत्र लिहिलंय!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI