‘या’ सरकारी कंपनीच्या नफ्यात साडेतीन पट वाढ, गुंतवणुकदारांसाठी लाभांशाची घोषणा होणार, वाचा सविस्तर

कोरोनाच्या काळात अनेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते नफा मिळवून देणाऱ्या कंपनीचे शेअर्स देखील शोधतात. अशा लोकांनी सरकारच्या या कंपनीची माहिती घेतल्यास फायदा होऊ शकतो.

'या' सरकारी कंपनीच्या नफ्यात साडेतीन पट वाढ, गुंतवणुकदारांसाठी लाभांशाची घोषणा होणार, वाचा सविस्तर


NTPC Q4 results मुंबई : कोरोनाच्या काळात अनेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते नफा मिळवून देणाऱ्या कंपनीचे शेअर्स देखील शोधतात. अशा लोकांनी सरकारच्या या कंपनीची माहिती घेतल्यास फायदा होऊ शकतो. सरकारच्या या कंपनीला यंदा तब्बल साडेतीन पट नफा झालाय. या कंपनीचं नाव आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC. एनटीपीसीने मार्च तिमाहीच्या नफ्याची घोषणा केलीय (Know about NTPC government compony whose profit increase by three and half percent).

कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये जवळपास 258 टक्क्यांनी वाढ झालीय. मार्च तिमाहीत कंपनीला 4,479 कोटी रुपयांचा नफा झालाय. मार्च 2020 मध्ये कंपनीचं स्टँडअलोन नेट प्रॉफिट 1,252 कोटी रुपये होतं.

मार्च तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 2.5 टक्के घट झाली. मात्र, या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न 26 हजार 567 कोटी रुपये झालं. कंपनीचं हेच उत्पन्न मागच्या वर्षी मार्च 2020 तिमाहीत 27,247 कोटी रुपये होतं. आता कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांसाठी लाभांश देण्याची घोषणा केलीय. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 3.15 रुपये अंतिम लाभांश देण्याची घोषणा केलीय. याआधी फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीने 3 रुपये प्रति शेअरच्या तत्कालीन लाभांशाची घोषणा केली होती.

कंपनीचं उत्पन्न नेमकं कसं वाढलं?

कंपनीच्या मार्च तिमाहीचं उत्पन्न पाहिलं तर पॉवर जनरेशनला 26,418 कोटी मिळाले. याशिवाय इतर मार्गांनी 1,446 कोटी रुपये उत्पन्न मिळालं. संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता 2020-21 मध्ये कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 36 टक्के वाढ नोंदवली गेलीय. ही रक्कम 13 हजार 769 कोटी रुपये इतकी आहे.

52 आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर शेअर

या आठवड्यात कंपनीच्या शेअरची किंमत 113.55 रुपयांवर पोहचली. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची सर्वोच्च किंमत 121 रुपये आणि निचांकी किंमत 78.10 रुपये आहे. या शेअरमध्ये एका आठवड्यात 4.42 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. मागील 3 महिन्यात हा शेअर 9.39 टक्के आणि या वर्षात आतापर्यंत 14.29 टक्के वाढला. या कंपनीत सरकारची भागीदारी 51.10 टक्के आहे. यानंतर सर्वात जास्त डोमेस्टिक इंस्टिट्यूशनल इन्वेस्टर्सकडे 34.08 टक्के भागिदारी आहे. या तिमाहीत प्रमोटर्सच्या भागिदारीत काहीही फरक पडलेला नाही.

हेही वाचा :

आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी, काय आहेत नवे नियम, कधीपासून लागू होणार?

Share Market Outlook : ‘या’ 10 मिडकॅप शेयर्सची किंमत आठवडाभरात 22 टक्क्यांनी कमी, योग्यवेळी खरेदी करुन मालामाल व्हा

Fathers Day : ‘फादर्स डे’ला वडिलांना आरोग्य विमा भेट द्या, 5 मोठे लाभ मिळवा

व्हिडीओ पाहा :

Know about NTPC government compony whose profit increase by three and half percent

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI