तुमच्याकडे फाटलेल्या नोटेचा अर्धाच तुकडा आहे, तरीही मिळणार पैसे, जाणून घ्या काय करावे लागेल?

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अर्धवट फाटलेल्या नोटेचेही मूल्य असते. आता प्रत्येक नोटेसाठी हा नियम वेगवेगळा आहे. मात्र, तरीही 500 किंवा 2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटेची तुम्हाला बऱ्यापैकी नुकसानभरपाई मिळू शकते.

तुमच्याकडे फाटलेल्या नोटेचा अर्धाच तुकडा आहे, तरीही मिळणार पैसे, जाणून घ्या काय करावे लागेल?

मुंबई: आपल्याकडी एखादी नोट चुकून फाटली तर ते पैसे फुकट गेले, असा समज असतो. आता ही नोट 500 किंवा 2000 रुपयांची असली तर मनाला आणखीनच रुखरुख लागते. मात्र, तुमच्याकडील नोट पूर्णपणे फाटली असेल, एवढेच काय तुमच्याकडे फाटलेल्या नोटेचा अर्धा भाग असेल तर तुम्ही रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळवू शकता. तुमच्याकडे नोटेचा जितका भाग असेल त्याप्रमाणात रिझर्व्ह बँक तुम्हाला पैसे परत देते. (RBI rules for torn notes)

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अर्धवट फाटलेल्या नोटेचेही मूल्य असते. आता प्रत्येक नोटेसाठी हा नियम वेगवेगळा आहे. मात्र, तरीही 500 किंवा 2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटेची तुम्हाला बऱ्यापैकी नुकसानभरपाई मिळू शकते.

रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर नमूद केलेल्या माहितीनुसार, 1 ते 20 रुपये मूल्याची नोट अर्धवट फाटली असेल तर त्याचे अर्धे मूल्य मिळू शकत नाही. अशा स्थितीत या नोटांचे पूर्ण मूल्य दिले जाते. पण 50 रुपये ते 2000 रुपयांच्या नोटा फाटल्या असतील तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळू शकते.

काय आहेत फाटलेल्या नोटांचे पैसे मिळवण्याचे नियम?

एका रुपयाची नोट ही 61.11 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 31 सेंटीमीटर स्क्वेअर भाग असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.

2 रुपयांची नोट 67.41 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 34 सेटींमीटर हिस्सा तुमच्याकडे असल्यास पूर्ण पैसे मिळतात.

5 रुपयांची नोट 73.71 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 37 सेंटीमीटरचा हिस्ला असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात.

10 रुपयांची नोट 86.31 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 44 सेटींमीटर हिस्ला असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात.

20 रुपयांची नोट 92.61 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 47 सेंटीमीटर हिस्सा असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात.

50 ते 2000 रूपये मूल्याच्या फाटलेल्या नोटांचे पैसे कसे मिळतात?

50 रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटांबाबत वेगवेगळे नियम आहेत. तुमच्याकडे जुन्या नोटेचा 43 सेंटीमीटर आणि नव्या नोटेचा 36 सेंटीमीटर हिस्सा असेल तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळते.

100 रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटांबाबत वेगवेगळे नियम आहेत. . तुमच्याकडे जुन्या नोटेचा 46 सेंटीमीटर आणि नव्या नोटेचा 75 सेंटीमीटर हिस्सा असेल तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळते.

200 रुपयांच्या नोटेचा 78 स्क्वेअर मीटर भाग असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात. तर 39 सेंटीमीटर भाग असल्यास अर्धेच पैसे मिळतात.

500 रुपयांच्या नोटेचा 80 सेंटीमीटर भाग असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. पण तुमच्याकडे केवळ 40 सेंटीमीटरचा हिस्सा असेल तर अर्धेच पैसे परत मिळतील.

2000 रुपयांच्या नोटेचा 88 सेंटीमीटर असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. तर 44 सेंटीमीटर हिस्सा असल्यास तुम्हाला अर्धेच पैसे मिळतील.

(RBI rules for torn notes)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI