सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे ‘मेकिंग चार्जेस’चा फंडा? अशा प्रकारे करता येईल कमी!

पण दागदागिने विकत घेतल्यास, एक गोष्ट नक्कीच नमूद केलेली असेल आणि ती म्हणजे दागिन्यांवर लागणारे मेकिंग चार्जेस. म्हणूनच, जेव्हा जेव्हा तुम्ही दागदागिने खरेदी करण्याचा विचार कराल, तेव्हा शुल्काबाबत आधी माहिती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोन्याची खरेदी करताना कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे ‘मेकिंग चार्जेस’चा फंडा? अशा प्रकारे करता येईल कमी!
सोन्याचा दर

मुंबई : अक्षय तृतीयाचा सण जवळ येणार आहे आणि भारतीय परंपरेनुसार या दिवशी बरेच लोक सोनं खरेदी करतात. याशिवाय लग्नाचा हंगाम असल्यानेही लोक सोनं खरेदी करत आहेत. आपण दागदागिने विकत घेतल्यास, एक गोष्ट नक्कीच नमूद केलेली असेल आणि ती म्हणजे दागिन्यांवर लागणारे मेकिंग चार्जेस. म्हणूनच, जेव्हा जेव्हा तुम्ही दागदागिने खरेदी करण्याचा विचार कराल, तेव्हा शुल्काबाबत आधी माहिती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोन्याची खरेदी करताना कोणतीही समस्या उद्भवणार नाही (Know details about gold ornaments making charges).

आज आपण मेकिंग चार्ज म्हणजे काय आणि दागिन्यांच्या किंमतीवर त्याचा कसा परिणाम होतो, हे जाणून घेणार आहोत. आपण सोने खरेदी करतो तेव्हा त्याची किंमत किती असते आणि त्याची गणना कशी केली जाते ते जाणून घेऊया. मेकिंग चार्जेस संबंधी काही खास गोष्टी…

मेकिंग चार्जेस म्हणजे काय?

वास्तविक, सोने किलोनुसार बाजारात आलेले असते. मग हे सोने वितळवून त्यावर नक्षी केली जाते. या सोन्यापासून अंगठी बनवणे, हार बनवणे किंवा इतर काही दागिने तयार करणे यासारख्या भिन्न आकारात ते मोल्ड केले जाते. याखेरीज प्रत्येक दागिन्यांच्याही वेगवेगळ्या डिझाईन असतात. अनेक दागदागिन्यांवर बारीक कलाकुसर केली जाते, तर बरेच दागिने साध्या सरळ नक्षीचे बनवले जातात. अगदी अंगठीचे उदाहरण घ्यायचे झाल्यास त्यात अनेक प्रकारच्या डिझाईन तयार केल्या जातात.

अशा वेळी सोन्याचे कोणत्याही दागिने बनवताना आलेल्या खर्चाला त्या दागिन्यांच मेकिंग चार्ज असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, दागदागिने तयार करणाऱ्या व्यक्तीची ही फी आहे, जे ते दागिने बनवण्यासाठी आकारतात. जर आपण नाणी किंवा दागदागिन्यांशिवाय इतर सोने विकत घेतले, तर त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही (Know details about gold ornaments making charges).

किती मेकिंग चार्ज आकारला जातो?

जेव्हा आपण कोणतीही दागदागिने खरेदी करता तेव्हा, त्यावर मेकिंग चार्ज आकारले जाते. हा मेकिंग चार्ज ज्वेलरी आणि त्याच्या डिझाईनवर अवलंबून असतो. जसे की, आपण हार खरेदी करत असाल आणि त्यावर बारीक नक्षीकाम केले असेल तर त्याचा मेकिंग चार्ज जास्त असू शकतो. तसे, सहसा कोणत्याही सोन्याच्या किंमतीच्या 5 ते 10 टक्के दरम्यान मेकिंग चार्ज आकारले जाते.

याची गणना कशी केली जाते?

बाजारात विकल्या जाणाऱ्या दागिन्यांची किंमत वास्तविक सोन्याच्या किंमतीपेक्षा जास्त असतात. ज्वेलर्सकडून आकारल्या जाणाऱ्या किंमतींमध्ये मेकिंग चार्जेस देखील समाविष्ट आहेत. समजा तुम्ही सोन्याची चेन विकत घेतली असेल आणि त्यातील सोन्याची किंमत 50 हजार रुपये असेल. तर, यावरील मेकिंग चार्ज 10 टक्के आहे, म्हणजेच तुम्हाला त्यावर 5 हजार रुपये अधिक द्यावे लागतील. यासह तुमची सोन्याच्या चेनची किंमत 55 हजार रुपये होईल. मेकिंग चार्ज हे सोन्याच्या वजनापेक्षा वेगळे असते.

मेकिंग चार्ज कसे कमी करू शकता?

आपण कोणतेही दागिने विकत घेत असाल तर डिझाईनमध्ये अधिक बारीक नक्षीकाम असलेला दागिना घेऊ नका. आपण जितके अधिक नक्षीकाम असलेले दागिने घ्याल, तितके अधिक मेकिंग चार्जेस वाढतील. तर, साध्या डिझाआनचे दागिने खरेदी केले, तर त्यावर मेकिंग चार्ज खूप कमी आकारला जाईल. मेकिंग चार्ज कितीही जास्त असला, तरीही आपण जेव्हा सोने किंवा दागिने मोडता, तेव्हा आपल्याला त्याची योग्य किंमत मिळत नाही.

(Know details about gold ornaments making charges)

हेही वाचा :

Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचे भावही वाढले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा दर

Post Office MIS: फक्त 1000 रुपये भरून दरमहा 4950 रुपये मिळवा, जबरदस्त फायदा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI