AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इनकम टॅक्ससाठी नवी वेबसाईट, केवळ 10 मिनिटात पॅन कार्ड मिळणार, वाचा…

जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचं असेल तर आता हे काम अगदी सोपं झालं आहे

इनकम टॅक्ससाठी नवी वेबसाईट, केवळ 10 मिनिटात पॅन कार्ड मिळणार, वाचा...
पॅन कार्ड
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 6:51 AM
Share

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचं असेल तर आता हे काम अगदी सोपं झालं आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची म्हणजेच एजंटची गरज नाही. हे काम तुम्हीही करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिटं पुरेशी आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तात्काळा पॅन कार्ड बनवू इच्छि असाल तर इनकम टॅक्सच्या नव्या अधिकृत वेबसाईटवर याची सोपी पद्धत आहे. वेबसाईट बदलल्याने पॅन कार्डची पद्धत बदलली असून अधिक वेळेची बचत करणारी आहे (Know how to apply for Pan Card within 10 Minutes on new income tax website).

विशेष म्हणजे येथे पॅन कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची किंवा कागदपत्र देण्याची गरज नाही. Instant Pan Card सुविधेमुळे विना वाट पाहता तुम्ही तात्काळ तुमची अडचण सोडवू शकता. यासाठी ऑनलाईन अर्ज करत पॅन नंबर तयार होतो. हे पॅन कार्ड इतर सामान्य पॅन कार्डप्रमाणेच वैध असतं. यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. ऑनलाईननंतर तुम्हाला पॅन कार्डची प्रत घरीही मागवता येते.

पॅन कार्डसाठी कसा अर्ज कराल?

  • Incometax.gov.in वर जा.
  • होम पेजवर Our Services या पर्यायात जाऊन See More वर क्लिक करा.
  • Instant E-Pan पर्यायावर Instant Pan Card साठी अर्ज करा.
  • नवं पॅन कार्ड बनवण्यासाठी Get New-ePIN वर क्लिक करा.
  • त्यानंतर आधार नंबर टाकून Continue वर क्लिक करा.
  • यानंतर व्हेरिफिकेशन होईल आणि आधारशी संलग्न फोनवर ओटीपी येईल.
  • यानंतर हा ओटीपी टाकून कन्फर्म करा.
  • कन्फर्म केल्यानंतर वेबसाइटवर आधार कार्डशी संबंधित माहिती दिसेल.
  • यानंतर आयडी तपासून ओके करा.

पॅन कार्ड डाऊनलोड कसा करणार?

  • यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर जाऊन पुन्हा Our Services पर्यायावर See More येथे क्लिक करा.
  • Instant E-Pan वर क्लिक करा आणि चेक स्टेट्स लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर आधार नंबर टाका.
  • ओटीपी टाका.
  • तुम्हाला तुमचं पॅन कार्ड दिसेल, ते डाऊनलोड करा.
  • हे ईपॅन डाऊनलोड करुन प्रत्येक ठिकाणी वापरता येतं.

हेही वाचा :

SBI Alert : या खातेदारांना जमा करावे लागेल आधार खाते आणि पॅनकार्ड, चेक करा तुमचेही नाव आहे का?

PF अकाऊंटशी संबंधित ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार

10 दिवसात करा हे काम अन्यथा आपले पॅनकार्ड होईल निरुपयोगी, 10 हजार रुपयांचा होऊ शकतो दंड

व्हिडीओ पाहा :

Know how to apply for Pan Card within 10 Minutes on new income tax website

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.