Gold Bond : नो लॉकर, नो टॅक्स; दराच्या अस्थिरतेतं व्याज हमखास: वाचा- गोल्ड बाँडची वैशिष्ट्ये

Gold Bond : नो लॉकर, नो टॅक्स; दराच्या अस्थिरतेतं व्याज हमखास: वाचा- गोल्ड बाँडची वैशिष्ट्ये
आजचे सोन्याचे दर
Image Credit source: TV9 Marathi

सुरक्षित आणि सर्वोत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणुकमाध्यकांकडे (INVESTOR DECESION) सर्वांचा कल आहे. सोन्यात गुंतवणुकीद्वारे निश्चित व्याज देणाऱ्या सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुक करण्यात अनेकजण पसंती देत आहेत.

दादासाहेब कारंडे

|

May 18, 2022 | 10:45 PM

नवी दिल्ली– सोन्याच्या किंमतीत (GOLD RATE) तेजी-घसरणीचं सत्र कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याचे भाव उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. राजधानी दिल्लीसहित महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्यानं 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. पूर्वीच्या तुलनेत सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात तेजी आहे. दरम्यान, गुंतवणुकदारांमध्ये सोन्याच्या भावाच्या अस्थिरतेबाबत मोठ्या प्रमाणात चिंता नाही. सुरक्षित आणि सर्वोत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणुक माध्यकांकडे (INVESTOR DECESION) सर्वांचा कल आहे. सोन्यात गुंतवणुकीद्वारे निश्चित व्याज देणाऱ्या सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुक करण्यात अनेकजण पसंती देत आहेत. सोने गुंतवणुकीत विविध आव्हांनाना सामोरं जावं लागतं. दागिने, बिस्किट किंवा इन्य माध्यमात सोनं बाळगण धोक्याचं ठरतं. यासर्वांपासून सुरक्षिततेचा मार्ग म्हणून सॉवरेन गोल्ड बाँडचा (SOVERING GOLD BOND) पर्याय सर्वोत्तम ठरतो.

थेट सरकारची हमी

सॉवरेन गोल्ड बाँड सरकारद्वारे जारी केले जातात. या बाँडमध्ये गुंतवणूक करण्याद्वारे वार्षिक स्वरुपात व्याज प्राप्त करणं शक्य ठरतं. सोन्याच्या किंमतीत वाढ किंवा घट झाल्याचा सॉवरेन गोल्ड बाँडवर कोणताही परिणाम दिसून येत नाही.

कशी कराल गुंतवणूक?

तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडचा पर्याय अजमाविण्याच्या मानसिकतेत असल्यास तुमच्यासाठी स्टेट बँकेचा ऑनलाईन पर्याय सक्षम ठरतो. तुम्ही स्टेट बँकेच्या वेबसाईटवर जाऊन थेट नेट बँकिंग अकाउंटवर लॉग-इन करू शकतात. यानंतर ‘ई-सर्व्हिस’चा पर्याय निवडा आणि त्यानंतर ‘सॉवरेन गोल्ड बाँड’वर क्लिक करा. संपूर्ण अटी व शर्तींचे अवलोकन केल्यानंतर ‘पुढे सुरू ठेवा’ वर क्लिक करा. नोंदणी अर्जात तु्म्ही खरेदी करू इच्छित असलेले सोन्याचे तपशील एन्टर करून अर्ज सेव्ह करा.

निर्णय एक, फायदे अनेक

निश्चित स्वरुपात मिळणारं व्याज सॉवरेन गोल्ड बाँडचा सर्वात मोठा फायदा मानला जातो. बाजाराच्या दराशी कोणत्याही प्रकारचा संबंध यादरम्यान नसतो. बाजारातील दर कमी किंवा अधिक झालेतरी सॉवरेन गोल्ड बाँडद्वारे निश्चित व्याजदर मिळतो. ग्राहकांना सोनं सुरक्षितपणे संग्राह्य करण्याची गरज यामुळे भासत नाही. तुम्हाला केंद्राकडून सोनं खरेदीचं प्रमामपत्र बहाल केलं जातं. तसेच तुम्हाला सोनं लॉकर मध्ये ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं शुल्क अदा करण्याची देखील आवश्यकता भासत नाही. तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबतच करात देखील सवलत मिळते. गोल्ड बाँडच्या सहाय्याने तुमच्यासमोर सुलभ कर्जाचा पर्याय देखील खुसा असतो.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें