AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : इंधन दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर घसरणीला लागले आहेत. दररोज या किंमती कमी जास्त होत आहेत. आज भावात घसरण झाली. तरीही देशात काही शहरात इंधन स्वस्त तर कुठे महाग झाले.

Petrol Diesel Price Today : इंधन दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव
आजचा भाव काय
| Updated on: Mar 18, 2023 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव पुन्हा एकदा घसरले. आज, 18 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 1.61 डॉलर घसरुन 66.74 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 1.73 डॉलरने घटली. आज हा भाव 72.97 डॉलर प्रति बॅरल आहे. या किंमतींच्या आधारे भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले. देशात काही शहरात इंधनाचे दर वाढले, तर काही ठिकाणी कालच्या पेक्षा दरात घसरण झाली. तुमच्या शहरातील इंधनाचे भाव तुम्हाला घर बसल्या कळतात. त्यासाठी पेट्रोल-पंपावर जाण्याची गरज नाही. तेल विपणन कंपन्यांनी त्यासाठी एसएमएस सुविधा सुरु केली आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी हे भाव जाहीर करतात.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.97 तर डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.73 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.22 आणि डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.59 तर डिझेल 94.07 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 95.05 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.57 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.70 आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.59 रुपये तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर

एका एसएमएसवर भाव 

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत