AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी डॉक्टर, अदानी यांचं शिक्षण किती?; त्यांच्या लग्नाचा किस्सा माहीत आहे काय?

उद्योगपती गौतम अदानी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. गौतम अदानी हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल थेट अत्यंत मोठा खुलासा केलाय. विशेष म्हणजे यावेळी ते त्यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसले.

पत्नी डॉक्टर, अदानी यांचं शिक्षण किती?; त्यांच्या लग्नाचा किस्सा माहीत आहे काय?
Gautam Adani
| Updated on: Apr 12, 2024 | 2:31 PM
Share

उद्योगपती गौतम अदानी हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. गौतम अदानी यांनी मोठा संघर्ष केलाय. गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. अनेक कंपन्या या गौतम अदानी यांच्या नावे आहेत. गौतम अदानी यांनी नुकताच आपल्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केलाय. यावेळी गौतम अदानी यांनी त्यांच्या लग्नाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. नेहमीच गौतम अदानी हे त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या पत्नीला देतात. गौतम अदानी यांच्या पत्नी डॉक्‍टर असून त्यांचे नाव प्रीती आहे.

गौतम अदानी हे हसत हसत म्हणाले की, मी हायस्कूल पास आणि कॉलेज सोडलेला आणि प्रीती डॉक्टर आहे. आमच्यामध्ये इतका मोठा फरक असतानाही प्रीतीने माझ्यासोबत लग्न करण्याचा एकप्रकारे धाडसीच निर्णय घेतला. एका पुस्तकात देखील याबद्दल खुलासा करण्यात आलाय. आरएन भास्‍करचे हे पुस्तक आहे.

त्यामध्ये लिहिण्यात आले की, प्रीती यांना गौतम अदानी हे आवडले नव्हते. गौतम अदानी यांना प्रीती यांचे वडील सेवंतीलाल यांनी पसंत केले होते. हेच नाही तर त्यावेळी प्रीती या डेंटिस्टचे शिक्षण घेत होत्या. सेवंतीलाल यांना गौतम अदानीच्या क्षमतेवर खूप जास्त विश्वास होता. हेच नाही तर गौतम अदानीसोबतच्या लग्नासाठी सेवंतीलाल यांनी मुलीला समजावले.

हेच नाही तर लग्नाच्या अगोदर प्रीती आणि गौतम अदानी यांची भेट झाली. या भेटीनंतर प्रीती यांनी लगेचच गौतम अदानी यांच्यासोबत लग्नाला होकार दिला. गौतम अदानी आणि प्रीती यांचे लग्न 1986 मध्ये झाले. गौतम अदानी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त प्रीती यांनी एक अत्यंत खास अशी पोस्टही लिहिली होती.

या पोस्टमध्ये प्रीती यांनी लिहिले होते की, 36 वर्षांपूर्वी मी माझे करिअर सोडले. गौतम अदानीसोबत एक नवीन प्रवास सुरू केला. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला त्या व्यक्तीबद्दल खूप आदर आणि अभिमान वाटतो. 60 व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सर्व स्वप्नांच्या पूर्तीसाठी प्रार्थना करते. गौतम अदानी हे कायमच त्यांच्या यशाचे श्रेय पत्नी प्रीती यांना देतात.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.