AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाचाल तर वाचवाल: तुम्हाला आयकर विभागाचा मेसेज मिळाला; सतर्क व्हा !

आर्थिक व खासगी तपशील योजनेचे आमिष दाखवून जाहीर करण्यास सांगितले आहे. मात्र, आयकर विभागाने यासंदर्भातील दावे फेटाळले आहेत. आयकर विभागाकडून वैयक्तिक माहितीसाठी विचारणा केली जात नाही.

वाचाल तर वाचवाल: तुम्हाला आयकर विभागाचा मेसेज मिळाला; सतर्क व्हा !
आयकर विभागImage Credit source: tv9
| Updated on: May 20, 2022 | 4:57 PM
Share

नवी दिल्ली- केंद्रीय आयकर विभागानं (INCOME TAX DEPARTMENT) बनावट मेसेजपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आयकर विभागाच्या नावे बनावट मेसेज समाजमाध्यमांवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आर्थिक व खासगी तपशील योजनेचे आमिष दाखवून जाहीर करण्यास सांगितले आहे. मात्र, आयकर विभागाने यासंदर्भातील दावे फेटाळले आहेत. आयकर विभागाकडून वैयक्तिक माहितीसाठी विचारणा केली जात नाही. त्यामुळे बनावट मेसेजपासून नागरिकांना सावध राहावे. आपले आर्थिक (ECONOMIC DETAILS) तसेच खासगी तपशीलांचे प्रकटीकरण करू नये. अन्यथा मोठ्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागू शकते. आयकर विभागाने केंद्राच्या अखत्यारीतील माध्यम संस्था पीआयबीचं ट्विट शेअर केलं आहे. ज्याद्वारे नागरिकांना कथित लॉटरी घोटाळ्यापासून (LOTTERY SCAM) सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पीआयबीनं व्हायरलं मेसेजचं तथ्यशोधन(फॅक्ट चेक)केलं आहे. लॉटरी जिंकण्याचा दावा करणारा व्हायरल मेसेज बनावट असल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे.

..तर, अकाउंटवर डल्ला-

अशाप्रकारच्या फसव्या योजनांसाठी माहिती एकत्रित केली जाऊ शकते. ज्याद्वारे सायबर गुन्हेगार थेट माहितीचा दुरुपयोग करू शकतात. त्यामुळे मोठ्या आर्थिक भुर्दंडाला देखील सामना करावा लागू शकतो असे मत सायबर तज्ज्ञांनी वर्तविलेलं आहे.

लाखो पाण्यात-

अलीकडील काळात रोजगाराच्या बनावट संधीच्या जाळ्यातही अनेक तरुण शिकार झाले होते. समाज माध्यमांवर आवाहन करुन तरुणांना नोकरीचं आमिष दाखविलं जातं. स्टाफ सिलेक्शन कमिशन तत्सम परीक्षांत निवडीच आमिष दाखवून फसवणुकीचं रॅकेट नुकतंच उजेडात आलं आहे.

अफवांपासून सावध राहा

पीआयबीनं फॅक्ट चेकच्या माध्यमातून दाव्याची सत्यता पडताळली आहे. व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्राची याबाबतची कोणतीही योजना आखलेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कसं कराल फॅक्ट चेक?

तुमच्याकडे अशाच स्वरुपाचे मेसेज येत असल्यास अशाप्रकारच्या मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्हाला पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेकचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर क्लिक करावे लागेल. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल pibfactcheck@gmail.com यावर तथ्य शोधन करू शकतात.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.