लक्ष्मीविलास बँकेच्या DBIL मध्ये विलीनीकरणाला मंत्रिमंडळाकडून मान्यता, NIIF ला 6 हजार कोटींचं मिळणार भांडवल

नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (NIIF) मध्ये 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीलाही यावेळी मान्यता देण्यात आली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:29 PM, 25 Nov 2020

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने लक्ष्मीविलास बँकेच्या डीबीएस (DBIL) बँक इंडिया लिमिटेड (डीबीआयएल) मध्ये विलीन होण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एटीसीमध्ये एफडीआयलाही मान्यता देण्यात आली आहे. नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (NIIF) मध्ये 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीलाही यावेळी मान्यता देण्यात आली आहे. (lakshmi vilas bank merger with dbil cabinet decisions said by prakash javdekar)

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदे घेत मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेने लक्ष्मीविलास बँकेचे डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्याचे आदेश दिले होते. यावेळी ATC Telecom Infra मध्ये 2480 कोटींची थेट परकीय गुंतवणूक करण्यासदेखील मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे. तर टाटा समूहातील कंपनी एटीसीचे 12 टक्के शेअर हे एटीसी पॅसिफिक एशियाने घेतले आहेत.

दोषींवर कारवाई झाली पाहिजे

प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, अशा घोटाळा करणाऱ्या कोणत्याही बँक कर्मचाऱ्यांची सुटका होणार नाही. अशा घटना लक्षात घेता दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असं रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांच्या व्यवहारावर कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहितीही प्रकाश जावडेकर यांनी दिली. स्वावलंबी भारताला चालना देण्यात मोदी सरकार भर देत असून यासाठी आता भांडवल उभं करण्यात येणार असल्याचं जावडेकर म्हणाले. (lakshmi vilas bank merger with dbil cabinet decisions said by prakash javdekar)

NIIF ला मिळणार 6 हजार कोटी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (एनआयआयएफ) ची स्थापना करण्यात आली आहे. ज्यामध्ये 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं आज मंत्रिमंडळाने ठरवलं. पुढच्या दोन वर्षांत ही गुंतवणूक करण्यात येईल. या अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बाँड मार्केटद्वारे 1 लाख कोटींपेक्षा जास्त रुपये उभे केले जाऊ शकतात.

इतर बातम्या – 

बँकांची कामं आजच उरकून घ्या, संप आणि वीकेंडमुळे पुढील चारपैकी तीन दिवस बँका बंद

मर्सिडीज बेंझने केली SBI सोबत भागीदारी, ग्राहकांना मिळणार धमाकेदार फायदे

(lakshmi vilas bank merger with dbil cabinet decisions said by prakash javdekar)