बँकांची कामं आजच उरकून घ्या, संप आणि वीकेंडमुळे पुढील चारपैकी तीन दिवस बँका बंद

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने उद्याच्या (२६ नोव्हेंबर) संपात सामील होण्याची घोषणा केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:47 PM, 25 Nov 2020

मुंबई : बँकेशी संबंधित तुमची कोणती कामं राहिली असल्यास, आजच (बुधवार 25 नोव्हेंबर) पूर्ण करा. कारण उद्या (गुरुवार 26 नोव्हेंबर)  देशातील बहुतांश बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित बँकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना सूचना दिली आहे. (Bank employees to go on a nationwide strike on November 26th)

राष्ट्रीय व्यापार संघटनांनी उद्या (26 नोव्हेंबरला) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (All India Bank Employees’ Association – AIBEA) (एआयबीईए) देखील या संपात सामील होण्याची घोषणा केली आहे. एआयबीईएच्या दाव्यानुसार महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि परदेशी बँकांचे सुमारे 30 हजार कर्मचारी संपात सहभागी होतील.

एआयबीईए ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता बहुतांश बँकांचे प्रतिनिधित्व करते. विविध सार्वजनिक आणि जुन्या खासगी क्षेत्रातील बँकांसह काही परदेशी बँकांचे चार लाख कर्मचारी त्यांचे सदस्य आहेत.

संपाचं कारण काय?

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लोकसभेने तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले आणि व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली विद्यमान 27 कायदे रद्द केले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगाच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. नवीन कायदे या कामगारांना कोणतेही संरक्षण देणार नाहीत, असं ‘एआयबीईए’चं म्हणणं आहे.

शनिवार-रविवारीही सुट्टी

26 नोव्हेंबरच्या संपाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बँकांचे कामकाज सुरळीत होईल. यानंतर पुन्हा एकदा 28 नोव्हेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 नोव्हेंबर रोजी रविवारमुळे बँका बंद राहतील. (Bank employees to go on a nationwide strike on November 26)

डिजिटल व्यवहार सुरळीत

26 नोव्हेंबरचा संप किंवा सुट्टीचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच आपण नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे व्यवहार करु शकता. त्याच वेळी आपण एटीएममधून पैसेही काढू शकता.

  • रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी केलेल्या धोरणांमुळे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ उद्या दिवसभर ग्रामीण बँका संपावर जात आहेत.
  • देशभरातील 21000 बँक संपावर जाणार आहेत.
  • भारतीय मजदूर संघ देशात आंदोलन करत आहे. ऑल इंडिया बँक असोसिएशनने एक दिवसाच्या संपाची हाक दिली आहे. सरकारी बँकांचे खासगीकरण आणि विलनीकरणाच्या धोरण विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. (Bank employees to go on a nationwide strike on November 26th)

संबंधित बातम्या :

बँक बुडाल्यानंतर तुमचे किती पैसे सुरक्षित असतील? जाणून घ्या…

SBI मध्ये खातं असेल तर लगेच चेक करा अकाऊंट, बँकेकडून ग्राहकांना ‘Alert’ जारी

(Bank employees to go on a nationwide strike on November 26)