EPFO : पेन्शन मिळण्यासाठी निवृत्तीनंतर आधी काय करावे? जाणून घ्या
ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. या योजनेतून तुम्ही पेन्शनचा लाभ कसा घेऊ शकता, चला तर मग जाणून घेऊया.

तुम्हाला पेन्शनचे काही नियम माहिती आहेत का? कर्मचाऱ्याने किमान 10 वर्ष काम केल्यावर ईपीएफओ सदस्यांना ईपीएस योजनेचा म्हणजेच पेन्शन ही मिळते किंवा लाभ मिळतो. ईपीएस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वयाच्या 58 वर्षांनंतर पेन्शन ही दिली जाते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
तुम्ही वर्किंग पर्सन असाल तर तुम्ही एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओचे सदस्य असणे आवश्यक आहे. ईपीएफ खाते दर महिन्याला आपल्या मासिक वेतनाचा एक भाग जमा करते, जे आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या निवृत्तीसाठी आहे.
निवृत्तीनंतर पीएफ खात्याची रक्कम एकरकमी मिळते. त्याचबरोबर ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा ही लाभ मिळतो. पेन्शनचा हा लाभ ईपीएफओचा भाग असलेल्या एम्प्लॉइज पेन्शन स्कीम i.e. EPS योजनेअंतर्गत मिळतो. आज आम्ही तुम्हाला ईपीएस स्कीमबद्दल सांगणार आहोत, या योजनेतून तुम्ही पेन्शनचा कसा फायदा घेऊ शकता.
ईपीएस योजनेचा लाभ कसा मिळेल?
कर्मचाऱ्याने किमान 10 वर्ष काम केल्यावर ईपीएफओ सदस्यांना ईपीएस योजनेचा म्हणजेच पेन्शनचा लाभ मिळतो. ईपीएस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वयाच्या 58 वर्षांनंतर पेन्शन दिली जाते.
ईपीएफओ अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी
जर तुम्ही निवृत्त झाला असाल आणि ईपीएस योजनेअंतर्गत पेन्शन मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला फॉर्म 10 डी भरावा लागेल. ईपीएफओकडून हा फॉर्म जारी केला जातो, ज्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. या पेन्शनचा लाभ वयाच्या 58 वर्षांनंतरच मिळतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास हा लाभ कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना म्हणजेच पत्नी, मुले किंवा पालकांना मिळतो.
ईपीएस अंतर्गत किती पेन्शन मिळते?
ईपीएस अंतर्गत किती पेन्शन मिळणार? तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला हे सूत्र लागू करावे लागेल. पेन्शनेबल पगार x पेन्शनेबल सेवा)70. पेन्शनयोग्य वेतन 15000 आहे. जर तुमची पेन्शनपात्र सेवा 20 वर्षांची असेल तर त्यानुसार तुम्हाला एकूण 4285 रुपये पेन्शन मिळेल. दरम्यान, नोकरी गेल्यास पीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात? याविषयी पुढे वाचा.
नोकरी गेल्यास पीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात?
जर तुमची नोकरी गेली तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढता येतात. मात्र, पैसे काढण्यासाठीही काही नियम हे आहेत. नोकरी सोडल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम ही काढू शकता. तर नोकरी सोडल्यानंतर 2 महिन्यांनी तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची पूर्ण रक्कम ही काढू शकता.
