शेवटच्या तारखेची कशाला पाहता वाट; 23000 करदात्यांनी भरला पण ITR

ITR Filing : आयकर विभागाची हे पाऊल अगदी योग्य ठरलं. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विभागाने करदात्यांना प्राप्तिकर रिटर्न भरण्याचे अर्ज उपलब्ध करुन दिले. पोर्टल पण सक्रीय झाले. या कल्पनेला करदात्यांनी उचलून धरेल. केवळ चारच दिवसांत 23 हजार जणांनी आयटीआर दाखल केले. ITR फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

शेवटच्या तारखेची कशाला पाहता वाट; 23000 करदात्यांनी भरला पण ITR
आयटीआर भरण्यात नवीन रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 11:25 AM

जर तुम्ही पण आयकर रिटर्न भरण्यासाठी शेवटच्य तारखेची वाट पाहत असला तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आयकर खात्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विभागाने ऑनलाईन आणि ऑफलाईन आयटीआर फॉर्म उपलब्ध करुन दिले. आर्थिक वर्ष 2023-24 आणि मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरु केली. त्याला करदात्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. 1 ते 4 एप्रिल या दरम्यान 23,000 आयकर रिटर्न दाखल करण्यात आले आहेत. असे पहिल्यांदाच घडले आहे. आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही आहे.

पहिल्यांदाच घडले बघा असे

गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच असे काही घडले आहे. आयकर खात्याने करदात्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयकर रिटर्न फॉर्म उपलब्ध करुन दिले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारात हे अर्ज उपलब्ध आहेत. कर भरणा करताना करदात्यांना अडचण येऊन नये, यासाठी ही सुगम पद्धत लागू करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

तुमच्यासाठी हा अर्ज योग्य

  • आर्थिक वर्ष 2023-24 आणि मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आयकर खात्याने आयटीआर -1, आयटीआर – 2, आयटीआर – 4 हे फॉर्म इनेबल केले आहेत. आयकर भरण्यासाठी करदात्यांन त्याचा वापर करता येईल. प्राप्तिकर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 ही आहे.
  • करदात्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांच्या आत असेल तर त्यांना आयकर रिटर्न फॉर्म -1 मदतीला येईल. अशा करदात्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत हा पगाराव्यतिरिक्त संपत्तीतून होणाऱ्या कमाईतून असू शकतो. याशिवाय व्याजातून होणारे उत्पन्न, लाभांश प्राप्ती, शेतीतून वार्षिक 5,000 रुपयांपर्यंतची कमाई, असे करदाते ITR फॉर्म -1 चा वापर करु शकतात. म्युच्युअल फंड, शेअर वा स्थावर मालमत्ता विक्रीतून कमाई होत असेल, एकाहून अधिक मालमत्ता असतील. तर अशा करदात्यांना आयटीआर -2 आधारे इनकम टॅक्स रिटर्न दाखल करता येतो.

व्यावसायिकांसाठी कोणता अर्ज योग्य

आयटीआर फॉर्म- 4 हा हिंदू अविभाजीत कुटुंबांसाठी आहे. अशा करदात्यांना व्यवसाय आणि इतर माध्यमातून एकूण 50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. कंपनीचे संचालक वा असूचीबद्ध इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक, शेती उत्पन्नातून वार्षिक 5,000 रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांना हा फॉर्म उपयोगी ठरतो.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.