दिवसाला फक्त 20 रुपयांच्या बचतीवर मिळवा 2 लाख 65 हजार, खास आहे LIC ची योजना

एलआयसीने (Lic) अशीच एक खास योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही अवघ्या 20 रुपयांची बचत करुन लाखो रुपये वाचवू शकता.

दिवसाला फक्त 20 रुपयांच्या बचतीवर मिळवा 2 लाख 65 हजार, खास आहे LIC ची योजना
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित असणार आहेत.
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 4:34 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) या जीवघेण्या काळात बचत करणं हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. अशात तुमचं उत्पन्न कमी असेल आणि तरीदेखील तुम्हाला बचत करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही कमी रक्कमेवर चांगली बचत करू शकता. एलआयसीने (Lic) अशीच एक खास योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही अवघ्या 20 रुपयांची बचत करुन लाखो रुपये वाचवू शकता. (lic aadhar shila plan save 20 rupess per day and earn 2 lakh 65 thousand know all details here)

आता तुम्ही तुमच्या दैनंदिन खर्चाचा विचार केला तर फक्त 20 रुपयांचा खर्च तुमच्यासाठी खुपच शुल्लक असेल. पण हेच 20 रुपये जर तुम्ही बचतीसाठी वापरले तर त्याचा तुम्हाला उत्तम फायदा होणार आहे. कारण अवघ्या 20 रुपयांच्या बचतीवर तुम्ही लाखोंनी कमवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुम्हाला बचतीची सवय होईल आणि काही वर्षानंतर चागले पैसेही मिळतील. जाणून घेऊयात काय आहे योजना.

आधार शिला योजना

‘आधार शिला योजना’ असं एलआयसीच्या या योजनेचं नाव आहे. या योजनेत अनेक प्रकारचे पर्याय आहेत. जर तुम्ही ही योजना वयाच्या 25 व्या वर्षी सुरू केली असेल तर दिवसाला 20 रुपये अशा हिशोबाने दरमहा सुमारे 600 रुपये जमा केले तर 20 वर्षानंतर तुम्ही 45 वर्षांचे असाल आणि याचे तुम्हाला 2 लाख 65 हजार रुपये मिळतील.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योनजनेमध्ये बचतीसोबतच तुमच्या कुटुंबासाठी 2 लाख रुपयांचे जोखीमही मिळत आहे. जर तुम्हालाही आधार शिला योजनेत पैसे जमा करायचे असतील तर खाली दिलेल्या कोणत्याही योजना तुम्ही घेऊ शकता.

किती असेल हप्ता ?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही या योजनेत पैसे जमा केल्यास तुम्हाला जीएसटीसह दरमहा 625 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्हाला दर तीन महिन्यांनी फी जमा करायची असेल 1874 रुपये, सहामाहीत 3708 रुपये आणि वार्षिक आधारावर 7339 रुपये द्यावे लागतील.

4 लाख कव्हरेज देखील उपलब्ध

आता एकूण जमा रक्कमेबद्दल बोलायचं झालं तर 20 वर्षांत तुम्ही 143778 रुपये जमा कराल आणि तुम्हाला 265000 रुपये मिळतील. सगळ्यात खास म्हणजे यामध्ये तुम्ही 30 टक्क्यांपर्यंतचा करसुद्धा वाचवू शकाल म्हणजेच तुमचे 44660 रुपये वाचतील. दरम्यान, दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडलं तर तुमच्या कुटुंबाला जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर 4 लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पैशांच्या बचतीमध्येही तुम्ही चांगला नफा कमवू शकता अशी ही योजना आहे. (lic aadhar shila plan save 20 rupess per day and earn 2 lakh 65 thousand know all details here)

संबंधित बातम्या – 

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी! एवढा मोठा व्यवसाय असतानाही श्रीमंतांच्या यादीत नाहीत रतन टाटा

गेल्या पाच वर्षात ‘या’ लोकांकडून सर्वाधिक सोन्याची खरेदी, पहिल्या क्रमांकावर कोण?

सोन्याच्या किंमतीत भाववाढ सुरुच, जाणून घ्या आजचे दर

(lic aadhar shila plan save 20 rupess per day and earn 2 lakh 65 thousand know all details here) (टीप : कुठल्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.