LIC : एसएमएस आला का? मग करु नका ही चूक, नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान, काय आहे एलआयसी अलर्ट..

LIC : एलआयसीने ग्राहकांसाठी अलर्ट घोषीत केला आहे..

LIC : एसएमएस आला का? मग करु नका ही चूक, नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान, काय आहे एलआयसी अलर्ट..
फसवणूक टाळाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 12:08 AM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक संदेश (SMS) पाठविला आहे. त्यात त्यांनी ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्याचा इशारा दिला आहे. या संदेशात ग्राहकांना केवायसी (KYC) पडताळा करताना जागरुक राहण्याचा सल्ला दिला आहे. देशात ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे एलआयसीने ग्राहकांना हा सल्ला दिला आहे.

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असल्याने सायबर भामटे ही नवीन नवीन आयडिया लढवत आहेत. ग्राहकांना फसविण्यासाठी जाळे फेकत आहेत. ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी एसएमएसचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे एलआयसीने ग्राहकांना सजग केले आहे.

एलआयसीने स्पष्ट केले आहे की, केवायसी पडताळ्यासाठी एलआयसी कधीही ग्राहकांना कॉल, एसएमएस, व्हॉट्सअप, ईमेल करत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशाप्रकारे केवायसी पडताळ्यासाठी कोणी संपर्क साधत असेल तर त्या कॉल, एसएमएस, व्हॉट्सअप, ईमेलला उत्तर न देण्याचे आवाहन एलआयसीने पॉलिसी होल्डर्सला केले आहे.

हे सुद्धा वाचा

एलआयसीने KYC अपडेट न केल्यास दंड लावण्यासंदर्भातील व्हायरल मॅसेजवर ट्विट केले आहे. त्यात, एलआयसीने अशा प्रकारच्या संदेशात वैयक्तिक माहिती शेअर न करण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. तसेच अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

एलआयसीने केवायसी अपडेट करण्याविषयी अशा मॅसेजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी एलआयसी ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याचे आवाहन करते. पण त्यासाठी कोणताही दंड आकारत नसल्याचे एलआयसीने स्पष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.