LIC ने ‘या’ सरकारी बँकेतील गुंतवणूक वाढवली, 14 कोटी शेअर्सची खरेदी

LIC ने यूनियन बँक ऑफ इंडियामधील त्यांची भागीदारी टक्क्यांनी वाढवली आहे. (LIC Union Bank of India)

LIC ने 'या' सरकारी बँकेतील गुंतवणूक वाढवली, 14 कोटी शेअर्सची खरेदी
Lic

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने सरकारी बँक यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) मध्ये गुंतवणूक केली आहे. LIC ने यूनियन बँक ऑफ इंडिया मधील शेअर्समधील टक्केवारी 2 टक्के वाढवली आहे. यानंतर यूनियन बँकेतील एलआयसीची टक्केवारी 5.06 टक्के झाली आहे. यापूर्वी LIC नं यूनियन बँकेतील शेअर्स 3.06 टक्के पर्यंत वाढवले होती.यूनियन बँकेच्या माध्यमातून एलआसीनं स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे. एलआयसीकडे यापूर्वी यूनियन बँकेतील 19 कोटी 79 लाख 23 हजार 251 इक्विटी शेअर्स होते. (LIC increased stake in Union Bank of India to over 5 percent buying 14 crore shares)

गुंतवणूक वाढवल्यानंत एलआयसीकडे किती शेअर्स?

एलआयसीनं यूनियन बँकेतील 2 टक्के शेअर्स विकत घेतल्यानंतर त्यांच्या शेअर्सची टक्केवारी 5.06 टक्के झाली आहे. एलआयसीनं शुक्रवारी यूनियन बँकेतील 14 कोटी 78 लाख 41 हजार 513 शेअर्स खरेदी केले. यामुळे एलआयसीकडे यूनियन बँकेतील 34 कोटी 57 लाख 64 हजार 764 शेअर्स आहेत.

यूनियन बँकेने QIP मार्फत 1,447.17 कोटी रुपये उभारले

यूनियन बँक ऑफ इंडियाने गुरुवारी क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल प्लेसमेंट (QIP) द्वारे 1,447.17 कोटी रुपये उभारले. दरम्यान LIC देखील यावर्षी IPO आणणार आहे. कारण केंद्र सरकारच्या संरचनात्मक निर्गंतवणूक धोरण पूर्णत्वासं जावं म्हणून करण्यात येत आहे.

एलआयसी (LIC) ने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये शेअर्स विक्रीतून 37,000 कोटी रुपयांचा फायदा कमावला आहे. एलआयसीची स्थापना झाल्यापासून एलआयसीनं सर्वाधिक पैसे शेअर्स विक्रीतून उभारले आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एलआयसीनं शेअर्स विक्रीतून 25,625 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. 2020-21मध्ये एलआयसीनं 94,000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.

एलआयसी सर्वात मोठा गुंतवणूकदार

भारतीय जीवन विमा निगम हा भारतीय बाजारातील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. एलआयसीकडे 34 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. एलआयसीचा मुख्य आर्थिक स्त्रोत शेअर्स विक्री, जीवन विमा पॉलिसी हा आहे.

संबंधित बातम्या

HDFC बँकेला RBI ने दिला मोठा झटका, या प्रकरणात लावला 10 लाखांचा दंड

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा

(LIC increased stake in Union Bank of India to over 5 percent buying 14 crore shares)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI