Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलआयसीच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवा पैसे; आयुष्यभर दर महिन्याला मिळेल 20 हजारांची पेन्शन

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली भारतीय जीवन विमा कंपनी (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच विम्याचे वेगवेगळे प्लॅन देत असते. एलआयसीची अशीच एक महत्त्वपूर्ण पॉलिसी आहे ती म्हणजे जीवन अक्षय या पॉलिसीमध्ये ग्राहकाला फक्त एकदाच एक विशिष्ट रक्कम भरावी लागते.

एलआयसीच्या 'या' योजनेमध्ये गुंतवा पैसे; आयुष्यभर दर महिन्याला मिळेल 20 हजारांची पेन्शन
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 7:10 AM

मुंबई – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली भारतीय जीवन विमा कंपनी (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच विम्याचे वेगवेगळे प्लॅन देत असते. एलआयसीची अशीच एक महत्त्वपूर्ण पॉलिसी आहे ती म्हणजे जीवन अक्षय, (Jeevan Akshay) या पॉलिसीमध्ये ग्राहकाला फक्त एकदाच एक विशिष्ट रक्कम भरायची असते, त्यानंतर त्याला आयुष्यभरासाठी दर महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. ही पेन्शनची रक्कम आपण या पॉलिसीमध्ये किती रुपये गुंतवणार आहोत त्यावर अवलंबून असते.

एलआयसीच्या या योजनेमध्ये आपण स्वत:साठी किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीसाठी पैशांची गुंतवणूक करू शकतो. या विम्याद्वारे मिळणारी रक्कम आपण आपल्या इच्छेनुसार दर महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला किंवा दर वर्षाला घेऊ शकतो. वर्षाकाठी रक्कम घेतल्याचा फायदा म्हणजे आपल्या हातात एक मोठी रक्कम येते. ती आपण आणखी इतर ठिकाणी गुंतवू  शकतो. या योजनेमध्ये गुंतवणुकीची कोणतही ठराविक लिमीट नाही, तुम्ही तुमच्या बजेटनुसार या योजनेत एक लाखपासून पुढे कितीही पैसे गुंतवू शकता.

काय आहे पॉलिसी 

या पॉलिसीमध्ये तुम्ही एक लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला  दर महिन्याला परतावा म्हणून 12 हजार रुपये मिळतील, किंवा तुम्हाला जर दर महिन्याला पेन्शन हवी असेल तर तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये दिले जातील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत जॉईट पद्धतीने देखील या विम्याचा लाभ घेऊ शकतात. 35 ते 85 वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

…तर दर महिन्याला मिळतील 20 हजार

दरम्यान या योजनेचे एकूण दहा वेगवेगळे प्रकार आहेत, गुंतवणूक करण्यापूर्वी  या सर्व प्रकाराचा अभ्यास करून गुंतवणूक केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो. यातीलच एक प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी पैसे भरल्यास तुम्हाला दर महिन्याला 20,967 रुपये एवढी  रक्कम मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला या योजनेत 40,72,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर आयुष्यभरासाठी तुमच्या खात्यावर दर महिन्याला 20,967 रुपये एवढी रक्कम जमा होईल.

संबंधित बातम्या 

देशात महागाईचा उच्चांक; भाजीपाल्याचे दर वाढले, टोमॅटो 80 रुपये किलो

Petrol Diesel Price: ऑईल कंपन्यांकडून नवे दर जाहीर; ‘असे’ चेक करा घरीबसल्या अपडेट भाव

शेअरबाजारात सलग दुसाऱ्या दिवशी पडझड; सेन्सेक्स 748 अंकांनी घसरला

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.