LIC Share: भाई यह रॉकेटसिंग है रॉकेटसिंग! LIC चा धाप लागलेला शेअर बुईंग, 20 टक्क्यांची घेणार भरारी, ब्रोकरेज फर्मचा अंदाज काय सांगतो?

LIC Share: एलआयसीच्या शेअरने अनेकांना घोर निराश केले आहे. पण ब्रोकरेज फर्मने एवढ्यातच निराश न होण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर जोरदार पळणार असल्याचा विश्वास फर्मने व्यक्त केला आहे.

LIC Share: भाई यह रॉकेटसिंग है रॉकेटसिंग! LIC चा धाप लागलेला शेअर बुईंग, 20 टक्क्यांची घेणार भरारी, ब्रोकरेज फर्मचा अंदाज काय सांगतो?
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Jul 05, 2022 | 6:00 PM

सरकारी विमा कंपनी एलआयसीने (LIC) आयपीओनंतर गुंतवणुकदारांची शेअर बाजारात घोर निराशा केली आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना घाम फोडला. हा शेअर(LIC Share) इतिहास रचेल असे वाटत असताना त्यानेही इतर आयपीओसारखीच गुंतवणूकदारांच्या पदरात नुकसान टाकले. परंतू गुंतवणूकदारांनी (Investors) इतक्यात निराश होण्याची गरज नसल्याचा दावा ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसावाल (Brokerage firm Motilal Oswal) ) यांनी केला आहे. ब्रोकरेज फर्मने हा शेअर रॉकेटसिंग असल्याचा आत्मविश्वास दिला आहे. त्यांनी हा शेअर खरेदी (Share Buy) करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित होण्याची शक्यता आहे. हा शेअर कमाल करणार असून तो 20 टक्क्यांची भरारी घेईल असा विश्वास ओसवाल फर्मला वाटत आहे.

भरारी घेण्याचा अंदाज

आजच्या व्यापारी दिवसाची खबरबात पाहता, दुपारी 1 वाजेपर्यंत एलआयसीचा शेअर बीएसई(BSE) निर्देशांकावर 2.25 टक्के तेजीने पळाला आणि 708 रुपयांवर पोहचला. व्यापारी सत्रात एक वेळा या शेअरमध्ये 3 टक्क्यांची तेजी आली होती. त्यासोबत हा शेअर 712.50 रुपयांवर पोहचला. त्यामुळे हा शेअर येत्या काही दिवसात 830 चे लक्ष्य सहज गाठेल असा विश्वास मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मला वाटत आहे. तसेच टार्गेट चं या फर्मने दिले आहे. याचा विचार करता, हा शेअर कमाल करणार असून तो 20 टक्क्यांची भरारी घेईल असा विश्वास ओसवाल फर्मला वाटत आहे.

कशामुळे ओसवाल करत आहे धाडस?

ओसवाल यांच्या मते, एलआयसी काही दिवसातच मार्जीनची तफावत काही दिवसात भरुन काढेल. इतक्या बिकट परिस्थितीत, आव्हाने आणि स्पर्धा असतानाही एलआयसीने मार्केटमध्ये त्यांचा दबदबा कायम ठेवला आहे. तसेच येत्या काही दिवसात वेगळ्या रणनितीचा वापर करत एलआयसी अजून प्रगती करेल असा विश्वास ओसवाल फर्मला वाटत आहे.

हे सुद्धा वाचा

एलआयसीचा शेअरने सर्वात खराब कामगिरी केली होती. हा शेअर 650 रुपयांवर घसरला होता. परंतू हा शेअर पुन्हा मजबुतीने वर आला आणि त्याने 9 टक्क्यांची वृद्धी नोंदवत बाजारातील दबदबा कायम ठेवला. एलआयसीचा मार्केट कॅप सध्या कमी असला तरी रणनिती यशस्वी झाल्यास एलआयसीचा शेअर रॉकेटप्रमाणे भरारी घेईल अशी आशा आहे. सध्या एलआयसीचा मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. आयपीओचा इश्यू प्राईसच्या वरच्या बँडचा हिशेब गृहीत धरता एलआयसीचे बाजार मूल्य 6,00,242 रुपये होते. परंतू, सध्या हे बाजार मूल्य 4.47 लाख कोटी रुपये आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें