LIC Share: गुंतवणुकदारांच्या काळजात धस्स ! एलआयसी शेअर नीचांकी पातळीवर

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एलआयसीचा शेअर सुचीबद्ध झाल्यापासूनच त्याच्या सुमार कामगिरीने गुंतवणुकादारांनी अगोदरच देव पाण्यात ठेवले आहे. आजही एलआयसीने गुंतवणुकदारांची घोर निराशा केली. एलआयसीचा शेअरमध्ये आजही घसरण झाली. शेअर 700 रुपयांच्या खाली घसरला.

LIC Share: गुंतवणुकदारांच्या काळजात धस्स ! एलआयसी शेअर नीचांकी पातळीवर
एलआयसीचा शेअर नीचांकी पातळीवरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 6:15 PM

विमा क्षेत्रातील दादा कंपनी एलआयसीच्या (LIC) शेअर बाजारातील कामगिरीमुळे गुंतवणुकदारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. मोठा गाजावाज करत मार्केटमध्ये उतरलेल्या एलआयसीमुळे गुंतवणुकदारांना (Investor) पहिल्याच दिवसांपासून देव पाण्यात ठेवावे लागेल. दिवसागणिक या शेअरचा प्रवास उलट दिशेने सुरु आहे. अमेरिकन बाजारातील घसरणीचा दणका आज भारतीय बाजाराला बसला. या तडाख्यात अनेक शेअर धराशायी झाले. त्यात एलआयसीची नौका हेलकावे खात आहे. एलआयसीचा शेअर आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर (Lowest Level) पोहचला. एलआयसीचा शेअरमध्ये आजही घसरण झाली. शेअर 700 रुपयांच्या खाली घसरला. एलआयसीने आज 669.50 रुपयांचा नीचांकी दर गाठला. सकाळी दहा वाजता हा शेअर 2.89 टक्क्यांनी घसरून बीएसईवर ((BSE) 689.20 रुपयांवर ट्रेंड करत होता. 17 मे 2022 रोजी एलआयसीचा शेअर बाजारात सुचीबद्ध झाला होता. तेव्हापासूनच्या घसरणीचा विचार करता आतापर्यंत हा शेअर 21.31 टक्क्यांनी घसरला आहे.

अँकर इन्व्हेस्टर्सच्या भूमिकेकडे लक्ष

एलआयसीची कामगिरी पाहता, सर्वांनाच घाम फुटला आहे. त्यात अँकर इन्व्हेस्टर्स ही दूर नाहीत. अँकर इन्व्हेस्टर्ससाठीचा लॉक-इन कालावधी आज, 13 जून रोजी संपला. आता या गुंतवणुकदारांना त्यांच्याकडील शेअर विक्री करता येतील. सध्या अँकर इन्व्हेस्टर्सकडे 59 दशलक्ष शेअर्स आहेत. हे अँकर इन्व्हेस्टर्स हे संस्थात्मक गुंतवणुकदार आहेत. यामध्ये 70 टक्के प्रमाण स्थानिक म्युच्युअल फंडाचे आहेत. एलआयसीच्या रडगाण्यामुळे अँकर इन्व्हेस्टर्स आता काय भूमिका घेतात. त्यांनी ही विक्रीचे सत्र सुरु केल्यास एलआयसी शेअर गुंतवणुकदारांची अवस्था ना घरी की ना घाट की होईल.

हे सुद्धा वाचा

1.5 लाख कोटींचा फटका

एलआयसी शेअरहोल्डर्सला आतापर्यंत 1.5 लाख कोटींचा फटका बसला आहे. त्यांचा गुंतवलेला पैसा पाण्यात गेला आहे. त्या पैशाला त्यांना विमा कवच घेता आले नाही. हा शेअर असाच कामगिरी बजावत राहिला तर गुंतवणुकादारांना मोठा फटका बसू शकतो. 17 मे रोजी हा शेअर 872 रुपयांवर विक्री झाला. सरकारने त्याच्या आयपीओची किंमत 949 रुपये ठरवली होती. यापूर्वी या शेअरने 708.70 रुपयांची नीचांकी आणि 920 रुपये उच्चांकी पातळी गाठली आहे.

पेटीएम, झोमॅटोचा जोर ओसरला

गेल्या वर्षी ज्या कंपन्यांनी आयपीओ बाजारात दाखल केले, त्यांची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे. भारतीय शेअर मार्केटबाबत बोलयाचे झाल्यास पेटीएम, झोमॅटो आणि एलआयसीच्या आयपीओने गुंतवणूदारांची निराशा केली आहे. या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणा या गुंतवणूकदारांना आतापर्यंत कोटयवधीचा फटका बसला आहे. यापुढेही या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता कमी आहे. या आयपीओमुळे चकाकते ते सर्व सोनं नसतं, असा नवख्या गुंतवणुकादारांना मोठा धडा मिळाला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.