एलआयसी स्टॉकची घसरण थांबता थांबेना… 775 रुपयांची बॉटम लेव्हलसह मार्केट कॅपही 5 लाखांपेक्षा कमी

शेअर्समध्ये होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे एलआयसीचे मार्केट कॅप आता 5 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले आहे. आयपीओच्या इश्यू प्राईसच्या अप्पर बँडनुसार एलआयसीचे मूल्य 6,00,242 कोटी रुपये होते, ते आता 4,91,705.32 कोटी रुपयांवर आले आहे.

एलआयसी स्टॉकची घसरण थांबता थांबेना... 775 रुपयांची बॉटम लेव्हलसह मार्केट कॅपही 5 लाखांपेक्षा कमी
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 2:26 PM

सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या (LIC) शेअरच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या व्यवहारात एलआयसीच्या शेअरने (LIC stock price) घसरणीचा  नवा नीच्चांक नोंदविला आहे. शेअर बाजारात लिस्टेड झाल्यानंतर एलआयसीच्या शेअरची किंमत 800 रुपयांच्या खाली आल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. इतकेच नाही तर या शेअर्सने (stock) ट्रेडिंग दरम्यान 775 रुपयांचा नवा लाइफटाइम नीचांक देखील बनवला आहे. एलआयसीच्या शेअर्सची अवघ्या आठवड्याभरात वाईट पध्दतीने घसरण झालेली दिसून येत आहे. यात, अनेक गुंतवणूकदारांचे नुकसानही झालेले दिसून येत आहे.

लिस्टींगपासून 11 टक्क्यांहून अधिक घसरण

सोमवारच्या (6 जून) ट्रेडिंग दरम्यान एलआयसीचा शेअर 775.40 रुपयांच्या पातळीवर घसरला होता. आतापर्यंतची एलआयसीच्या शेअर्सही ही सर्वाधिक खराब कामगिरी मानली जात आहे. बाजार बंद झाल्यानंतर सोमवारी शेअर 22.85 रुपयांनी म्हणजेच 2.86 टक्क्यांनी घसरून 777.40 रुपयांवर बंद झाला. एलआयसीला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बाजारात लिस्टींग होउन झाला आहे आणि लिस्ट झाल्यानंतर त्याच्या शेअरची किंमत 11 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

गुंतवणूकदारांचे झाले नुकसान

शेअर्सच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे, एलआयसीचे मार्केट कॅप आता 5 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले आहे. आयपीओच्या इश्यू प्राईसच्या वरच्या बँडनुसार, एलआयसीचे मूल्य 6,00,242 कोटी रुपये होते. सध्या त्याचे मूल्य 4,91,705.32 कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ असा, की ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओत पैसे गुंतवले आहेत त्यांनी आतापर्यंत 1.08 लाख गमावले आहेत. एलआयसी स्टॉकमध्ये येईपर्यंत एलआयसीच्या आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. दरम्यान, पहिल्याच दिवशी एलआयसीचा शेअर 13 टक्क्यांपर्यंत घसरला होता आणि शेवटी तो 8.62 टक्क्यांनी म्हणजेच 867.20 रुपयांवर स्थिरावला होता. आतापर्यंत, इश्यू किमतीच्या तुलनेत तो 18 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

875 रुपयांची टार्गेट प्राइस

दरम्यान, ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलने एलआयसीचे कव्हरेज सुरू केले आहे. फर्मने एलआयसीला होल्ड रेटिंगसह 875 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. जर एमके ग्लोबलचा अंदाज बरोबर निघाला, तर याचा अर्थ असा, की ज्या गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली आहे त्यांना तोटा सहन करावा लागेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.