AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC ची विशेष योजना: दररोज 200 रुपयांची बचत अन् मिळणार 28 लाख, प्रीमियमबद्दल जाणून घ्या

डेथ सम अॅश्युअर्डवर अंतिम अतिरिक्त बोनस (FAB) आणि सिंपल रिव्हिजनरी बोनस दिले जातात, जे भरलेल्या सर्व प्रीमियममध्ये जोडले जातात. मृत्यूवर विम्याची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या 10 पट (एलआयसी प्रीमियम) पेक्षा जास्त असू शकते. पॉलिसीच्या 5 वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विमा रकमेच्या 100% रक्कम मिळेल.

LIC ची विशेष योजना: दररोज 200 रुपयांची बचत अन् मिळणार 28 लाख, प्रीमियमबद्दल जाणून घ्या
LIC IPO
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 24, 2021 | 8:31 AM
Share

नवी दिल्लीः LIC Jeevan Pragati Plan: एलआयसीच्या अनेक योजना आहेत, ज्यामध्ये काही रुपये जमा करून मॅच्युरिटीवर करोडपती होऊ शकता. एवढेच नाही तर एलआयसीच्या योजना विमाधारकांना विमा संरक्षणदेखील देतात. ठेवीदारासोबत अनुचित घटना घडल्यास किंवा तो जग सोडून गेल्यास त्याच्या नॉमिनीला विम्याचा पूर्ण लाभ मिळतो. परिपक्वतेचा प्रत्येक पैसा त्याला दिला जातो. यामध्ये LIC जीवन प्रगती योजना नावाची योजना आहे.

तर तुम्हाला दरमहा 6000 रुपये किंवा दररोज सुमारे 200 रुपये जमा करावे लागतील

एलआयसी जीवन प्रगती योजनेत जर तुम्हाला 28 लाख रुपयांची परिपक्वता हवी असेल, तर तुम्हाला दरमहा 6000 रुपये किंवा दररोज सुमारे 200 रुपये जमा करावे लागतील. हे चक्र 20 वर्षे चालले पाहिजे. एवढी रक्कम 20 वर्षे सतत जमा केली, तर 28 लाख रुपये मिळतील. या पैशाशिवाय ठेवीदाराला जोखीम कवचही मिळेल. म्हणजेच पॉलिसीदरम्यान ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला पॉलिसीचे पैसे मिळतील. एलआयसी जीवन प्रगती योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे जोखीम संरक्षण दर 5 वर्षांनी वाढते. म्हणजेच तुम्हाला जितके पैसे आधी मिळतात, ते 5 वर्षांनी जास्त मिळतात.

LIC जीवन प्रगती योजनेची वैशिष्ट्ये

ही योजना बचत आणि संरक्षण लाभांसह नॉन-लिंक केलेली योजना आहे. ही एक वैयक्तिक योजना आहे, ज्यात एखाद्या व्यक्तीला योजना घ्यावी लागते. प्रीमियम भरण्यासाठी वार्षिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि मासिक पर्यायांपैकी एक निवडू शकतो. पॉलिसी टर्म- किमान 12 वर्षे आणि कमाल 20 वर्षे विमा रक्कम, अंतिम अतिरिक्त बोनस (FAB) आणि साधा पुनरावृत्ती बोनस मॅच्युरिटी (एलआयसी मॅच्युरिटी) वर दिला जातो. तुम्ही किमान 1.5 लाख रुपये विमा रकमेच्या रूपात आणि जास्तीत जास्त कितीही पैसे जमा करू शकता.

डेथ बेनिफिटमध्ये काय उपलब्ध?

डेथ सम अॅश्युअर्डवर अंतिम अतिरिक्त बोनस (FAB) आणि सिंपल रिव्हिजनरी बोनस दिले जातात, जे भरलेल्या सर्व प्रीमियममध्ये जोडले जातात. मृत्यूवर विम्याची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या 10 पट (एलआयसी प्रीमियम) पेक्षा जास्त असू शकते. पॉलिसीच्या 5 वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विमा रकमेच्या 100% रक्कम मिळेल. जर मृत्यू 6-10 वर्षांच्या आत झाला तर विमाधारकाला विम्याच्या रकमेच्या 125%, पॉलिसीच्या 11 ते 25 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास विम्याच्या रकमेच्या 150% आणि पॉलिसीच्या 16 ते 20 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास मग नामनिर्देशित व्यक्ती तुम्हाला विमा रकमेच्या 200 पट परतावा मिळेल.

सोप्या भाषेत समजून घ्या

या योजनेचे जसे नाव आहे, तसेच कामही आहे. पॉलिसीची मुदत जसजशी वाढत जाते, तसतसे भांडवल जमा होते. सोप्या भाषेत समजून घ्या. समजा 25 वर्षीय राजशेखर यांनी 20 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी LIC जीवन प्रगती योजना खरेदी केली. राजशेखर यांनी ही पॉलिसी 3 लाखांच्या प्रीमियमने खरेदी केली आणि प्रीमियमची मुदत मासिक ठेवली आहे. अशा प्रकारे त्यांना दरमहा 1240 रुपये प्रीमियम (एलआयसी प्रीमियम) भरावा लागेल. ही एक पॉलिसी आहे, ज्यात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 3 लाखांची विमा रक्कम 6 लाखांपर्यंत जाते. पॉलिसीच्या मुदतीनुसार ते वाढते. जर राजशेखरने दरमहा रु. 1240 चा प्रीमियम भरला, तर त्यांना मॅच्युरिटीवर (LIC मॅच्युरिटी) रु. 3 लाख, रिव्हिजनरी बोनसचे रु. 2.46 लाख, अंतिम अतिरिक्त बोनस म्हणून रु. 21 हजार मिळतील. अशा प्रकारे राजशेखर यांना एकूण 5.67 लाख रुपये मिळतील. राजशेखरने दर महिन्याला हप्ता म्हणून 6000 रुपये जमा केले तर त्यांना 20 वर्षांत 28 लाख रुपये सहज मिळतील.

संबंधित बातम्या

‘या’ शेजारील देशाची तिजोरी रिकामी, इंधन खरेदीसाठी भारताकडून घेतले 500 दशलक्ष डॉलर कर्ज

कोरोना काळात पेट्रोल अन् डिझेलच्या किमतीत मोठी वाढ, पेट्रोल 36 रुपयांनी, डिझेल 27 रुपयांनी महाग

LIC’s special plan: Save Rs 200 per day and get Rs 28 lakh, learn about premium

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद