AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : वडिलांचा कित्ता गिरवला! मुकेश अंबानी यांच्याप्रमाणेच मुलांनी पण घेतला हा निर्णय

Mukesh Ambani : रिलायन्स समूहाच्या पिढील पिढीने वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाच नाही तर तो अंमलात पण आणला. दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलं आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांचा पगाराविषयीचा निर्णय सध्या जोरदार चर्चेत आला आहे. त्यांच्या निर्णयामुळे रिलायन्सचा सक्षम वारसा मिळाल्याची चर्चा समूहात सुरु आहे.

Mukesh Ambani : वडिलांचा कित्ता गिरवला! मुकेश अंबानी यांच्याप्रमाणेच मुलांनी पण घेतला हा निर्णय
| Updated on: Sep 26, 2023 | 6:51 PM
Share

नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : भारतच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) गेल्या काही वर्षांपासून वेतन घेत नाहीत. कोरोना काळात त्यांनी हा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षात त्यांनी कंपनीकडून वेतन घेतलेले नाही. मागे त्यांचा एक व्हिडिओ पण तुफान व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी सोबत कधीच पैसे बाळगत नसल्याचे सांगितले. फार पूर्वीपासून खिशात पैसाच बाळगत नसल्याचे त्यांनी सांगितले. ते कोणत्याही प्रकारचे क्रेडिट कार्डही वापरत नाहीत. त्यामुळे बिल पेमेंट करताना त्यांच्यासोबत नेहमी कोणी ना कोणी असते. पैसा त्यांच्यासाठी एक उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचे त्यांचे मत आहे. आता त्यांच्या एका निर्णयाचा कित्ता त्यांची तीनही मुलं गिरवणार आहेत. काय घेतला आकाश (Aakash Ambani), ईशा (Isha Ambani) आणि अनंत अंबानी यांनी निर्णय?

नाही घेणार सॅलरी

मुकेश अंबानी गेल्या तीन वर्षांपासून कोणतेही वेतन घेत नाहीत. आता त्यांच्याप्रमाणेच आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी कंपनीकडून वेतन (Akash, Isha, Anant Ambani Salary) घेणार नाहीत. त्यांनी हा निर्णय घेतल्याची वार्ता पसरली आहे. त्यांना केवळ संचालक मंडळाच्या बैठकीला हजर लावण्यासाठी अनुषांगिक लाभ देण्यात येतील. रिलायन्स इंडस्ट्रीजने तिघांच्या संचालक मंडळावरील नियुक्तीविषयीच्या प्रस्तावात याविषयीची माहिती दिली आहे.

शेयरहोल्डर्सकडून घेणार मंजुरी

रिलायन्स इंडस्टीज आता त्यांच्या शेअर होल्डर्सकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवतील. या प्रस्तावात तिघांच्या नियुक्तीचा विषय ठरलेला आहे. या प्रस्तावानुसार संचालकांना या बैठकांसाठी जो देय भत्ता आहे. तो द्यावा लागेल. पण नवीन संचालक या पदासाठी कोणतेही शुल्क घेणार नाहीत.

तीनही मुलांचा संचालक मंडळात सहभाग

या 28 ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी RIL च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याविषयीचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांची तीनही मुलं आकाश, ईशा आणि अनंत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळात असतील.

या व्यवसायाचा खाद्यांवर भार

  1. आकाश अंबानी रिलायन्स टेलिकॉम कंपनीचा कारभार पाहत आहे
  2. ईशा अंबानी रिलायन्स रिटेलच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची जबाबदारी संभाळत आहेत
  3. तर अनंत अंबानी यांच्याकडे रिलयान्स एनर्जी आणि अक्षय ऊर्जेचा कारभार आहे
  4. मुकेश अंबानी यांनी मुलांकडे वेगवेगळ्या क्षेत्राची जबाबदारी वाटून दिली आहे
  5. मुकेश अंबानी पुढील पाच वर्षे कंपनीच्या चेअरमन पदी असतील
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.