AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Share : दारुने नाही, दारुच्या शेअरने केले मालामाल, 1 लाखाचे वर्षभरात झाले 8 लाख

Piccadilly Agro Rocket Share : दारु तयार करणारी कंपनी पिकॅडिली ॲग्रो मध्ये ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली, त्यांना लॉटरी लागली. एक वर्षानंतर या शेअरची किंमत आता 8,42, 400 रुपये झाली आहे. गेल्या 6 महिन्यात गुंतवणूकदारांना या कंपनीने दुप्पट परतावा दिला आहे.

Multibagger Share : दारुने नाही, दारुच्या शेअरने केले मालामाल, 1 लाखाचे वर्षभरात झाले 8 लाख
या शेअरची रॉकेट भरारी
| Updated on: Aug 30, 2024 | 5:10 PM
Share

जर तुम्ही मद्यप्रेमी असला तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जगातील बेस्ट व्हिस्की इंद्री तयार करणारी कंपनी पिकॅडिली ॲग्रोच्या शेअरमध्ये तुफान तेजीचे सत्र आहे. पिकॅडिली ॲग्रोचा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. या शेअरमध्ये शुक्रवारी 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. मुंबई स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 800.95 रुपयांवर पोहचला. त्यामुळे मद्यप्रेमीसोबतच गुंतवणूकदार मालामाल झाले. ही कंपनी लवकरच दोन नवीन व्हिस्की ब्रँड्स बाजारात आणणार आहे.

कँटिनमध्ये मिळतील दोन ब्रँड्स

कंपनीच्या 2 मेन व्हिस्की ब्रँड्सला सेंट्रल ऑर्म्ड पुलिस फोर्सेज कँटिनमध्ये पुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. पिकॅडिली ॲग्रोच्या शेअरमध्ये गेल्या 5 वर्षांत 10000 टक्क्यांपेक्षा अधिकची उसळी आली आहे. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 910.70 रुपये आहे. तर पिकॅडिली ॲग्रोचा शेअरचा 52 आठवड्याती निच्चांक 95 रुपये आहे. एकाच वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 593.10 टक्क्यांपेक्षा अधिकची कमाई करुन दिली आहे.

1 लाखाचे झाले 8 लाख

दारु तयार करणाऱ्या पिकॅडिली ॲग्रोमध्ये ज्यांनी 95 रुपये प्रति शेअर या भावाने एक लाख रुपयांचे शेअर खरेदी केले. त्यांना 593 टक्क्यांचा फायदा झाला. त्यांचे एक लाख रुपये आता 8,42, 400 रुपये इतके झाले आहेत. एक वर्षापूर्वी कंपनीचा शेअर 95 रुपये होता. तर आता हा शेअर 800 रुपयांवर पोहचला आहे. याशिवाय कंपनीत सहा महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांना दुप्पट फायदा झाला आहे. गेल्या सहा महिन्यात पिकॅडिली ॲग्रोचा शेअरमध्ये 115 टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला आहे.

5 वर्षांत 10000% अधिकची उसळी

पिकॅडिली ॲग्रोचा शेअर गेल्या 5 वर्षांत 10400 टक्क्यांहून अधिकने उसळला आहे. या कंपनीचा शेअर 30 ऑगस्ट 2019 रोजी 7.34 रुपयांवर होता. तर हा शेअर या 29 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजवर 788.45 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 8300 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.